मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नवे संघ आहेत. गुजरात आणि लखनऊ. या दोन्ही संघाचा पहिला सामना आज वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या दोन्ही संघांनी मैदानात उतरण्याआधी कंबर कसली आहे. मात्र त्यापूर्वी गुजरात संघाने एक मोठा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामना सुरू होण्यापूर्वी गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने मोठी घोषणा केली. टीममधील भरवशाच्या खेळाडूवर एक मोठी जबाबदारी दिली. याबाबत अधिकृत घोषणा त्याने आज केली आहे. त्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.


या खेळाडला मोठा जबाबदारी


गुजरात फ्रान्चायझीने आयपीएलमध्ये संघाच्या उपकर्णधाराची घोषणा केली. हार्दिक पांड्या कर्णधार असेल तर अफगाणिस्तानचा स्टार लेग स्पिनर राशिद खान उपकर्णधार असणार आहे. गुजरात संघाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून माहिती दिली आहे. 


राशिद खानने 2017 मध्ये आयपीएलमध्ये सहभाग घेतला होता. गुजरात संघाने राशिदला 15 कोटी रुपये देऊन संघात सहभागी करून घेतलं होतं. याआधी राशीद हैदराबाद संघात होता. पहिल्यांदा हैदराबादने त्याला रिटेन केलं मात्र नंतर रिलिज केलं. गुजरात संघाने राशिदला आपल्या संघात घेतलं. 


आयपीएलमधील रेकॉर्ड


राशिद खाननं आतापर्यंत 76 आयपीएलचे सामने खेळले आहेत. त्याने यामध्ये 93 विकेट्स घेतल्या. 19 धावा देऊन 3 विकेट्स घेण्याची त्याची कामगिरी सर्वश्रेष्ठ राहिली आहे. गेल्या वर्षी त्याने 14 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या होत्या. 


गुजरात टाइटंस का स्क्वाड 


हार्दिक पांड्या (कर्णधार), राशिद खान (उपकर्णधार) शुभमन गिल, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्यूसन, अभिनव सदरंगानी, राहुल तेवतिया, नूर अहमद, आर साई किशोर, डोमिनिक ड्रेक, जयंत यादव, विजय शंकर, दर्शन नालकांडे, यश दयाल, अल्जारी जोसेफ, प्रदीप सांगवान, डेविड मिलर, रिद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, गुरकीरत सिंह, वरुण एरॉन,बी साई सुदर्शन.