टी-20 वर्ल्डकपपूर्वी Team India साठी मोठी Good News; `हा` घातक गोलंदाज झाला फीट!
टी-20 वर्ल्डकप सुरू होण्यास एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. त्याआधी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये.
मुंबई : टी-20 वर्ल्डकप सुरू होण्यास एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. त्याआधी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. इनसाइडस्पोर्टच्या माहितीनुसार, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मधील फिटनेस चाचणी यशस्वीरित्या उत्तीर्ण केलीये. याचा अर्थ असा की, तो श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि मोहम्मद सिराज यांच्यासह ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. जे सर्व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेचा भाग होते.
निवड समितीच्या एका सदस्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, “शमी ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी तंदुरुस्त आणि ठीक आहे. त्याचे काही सेशन चांगले झाले. त्याच्याकडे सामन्यांच्या सरावाचा अभाव आहे आणि त्यांना 100% पर्यंत आणण्यासाठी आम्हाला दोन सराव सामन्यांवर अवलंबून रहावे लागेल. हे एक मोठे आव्हान आहे पण तो अनुभवी गोलंदाज आहे आणि त्याला काय आवश्यक आहे हे माहीत आहे."
कोरोनाची झाली होती लागण
32 वर्षीय मोहम्मद शमी गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी संघात होता. पण कोविड-19 पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला बाहेर पडावं लागलं. कोविड-19 मधून पूर्णपणे बरा न झाल्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सिरीजचा भागही होऊ शकला नाही.
IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्सच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शमीने गेल्या वर्षीच्या वर्ल्डकपनंतर भारतासाठी एकही T20 सामना खेळलेला नाही. IPL 2022 मध्ये शमीने 16 सामन्यात 24.40 च्या सरासरीने 20 विकेट घेतल्या.
आंतरराष्ट्रीय विक्रम
मोहम्मद शमीने भारतासाठी आतापर्यंत 60 टेस्ट, 82 वनडे आणि 17 टी-20 सामने खेळले आहेत. मोहम्मद शमीच्या नावावर 216 टेस्ट, 152 वनडे विकेट आणि 18 टी-20 विकेट आहेत. मोहम्मद शमीची टेस्टमध्ये 27.45 ची सरासरी आहे, जी खूप चांगली म्हणता येईल.