जोहान्सबर्ग : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 113 धावांनी विजय मिळवला होता. आता टीम इंडियाला जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर सिरीज जिंकून इतिहास घडवायचा आहे. मात्र टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण होण्यात पाऊस अडखळा निर्माण करण्याची शक्यता आहे.


भारतासाठी लकी आहे वांडरर्स मैदान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोहान्सबर्गच्या वांडरर्स मैदानावर टीम इंडियाची एकही कसोटी हरली नाही. त्यामुळे भारताला या मैदानावर इतिहास घडवण्याची संधी आहे.


पाऊस अडथळा बनण्याची शक्यता


सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा दुसरा दिवसी पावसाने खेळ केला. सध्या जोहान्सबर्गमध्येही पावसाची शक्यता दिसून येतेय. हवामानाचा जास्त खराब असल्यास सामना अनिर्णित ठरण्याची शक्यताही आहे. 


टीम इंडियाचं संभाव्य प्लेइंग 11


विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.