मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 47 सामने झाले आहेत. अजून 27 सामने खेळायचे बाकी आहेत. गुजरातने प्लेऑफचं तिकीट काढलं आहे. उर्वरित कोणत्या टीम प्लेऑफपर्यंत पोहोचतात ते पाहावं लागणार आहे. प्लेऑफ आणि फायनल सामन्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्लेऑफ आणि फायनल सामने कुठे होणार याची माहिती बीसीसीआयने दिली. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी याबाबत खुलासा केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. तर प्लेऑफचे सामने कोलकाता आणि अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहेत. 


IPL 2022 चा क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामना कोलकाता मधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. तर क्वालिफायर 2 आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. IPL 2022 चा फायनल सामना 29 मे रोजी होणार आहे.


या फायनल सामन्यासाठी किती टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी असणार याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली आहे. यंदा आयपीएलच्या ट्रॉफीसाठी गुजरात टीमचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही ट्रॉफी कोण जिंकणार याची उत्सुकता ताणली गेली आहे.