पाकिस्तान क्रिकेटपटूला मोठा धक्का, नियम मोडल्याने मिळाली शिक्षा
क्रिकेटपटूने नियम मोडल्याने मिळाली शिक्षा, कोण तो क्रिकेटपटू आणि त्याने कोणता नियम मोडला? जाणून घ्या
मुंबई : जगभरात क्रिकेटर आपलं आयुष्य खूप सुखासीन जगण्याचा प्रयत्न करतात. क्रिकेटर महागड्या गाड्या घेऊन फिरतात. त्यांना मैदानात नियम मोडल्यावर जशी शिक्षा होते तशीच ते सेलिब्रिटी असले तरी समाजात वावरताना नियम मोडल्याने शिक्षा होते. याचं उदाहरण पाकिस्तानातून पाहायला मिळाला.
पाकिस्तानच्या क्रिकेटपटूला वेगानं गाडी चालवणं महागात पडलं. गाडी ओव्हरस्पीडमध्ये असल्याने त्याला पोलिसांनी दंड ठोठावला आहे. याचं ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला पोलिसांनी पकडलं. आफ्रिदी वेगावर नियंत्रण न ठेवता गाडी चालवत होता. त्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तो लाहोर ते कराची प्रवास करत होता. त्यावेळी ही घटना समोर आली.
पोलिसांनी आफ्रिदीला वॉर्निंग दिली आणि 1500 रुपयांचा दंड ठोठावला. त्यानंतर आफ्रिदीला सोडण्यात आलं. त्याने आपली चूक पोलिसांसमोर मान्य केली. त्यानंतर त्याने पोलिसांसोबत फोटो काढला. पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल त्याने टीका न करता चांगली असल्याचं म्हटलं आहे.
शाहिनने संपूर्ण घटना ट्वीट करून चाहत्यांना सांगितली. महामार्गावर गाडीचा स्पीड 120 किमीपेक्षा कमी असायला हवा असंही त्याने आवाहन केलं आहे.
42 वर्षीय शाहिद आफ्रिदीने आपल्या शानदार कारकिर्दीत अनेक षटकार ठोकले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण 476 षटकारांची नोंद आहे. त्याने पाकिस्तानसाठी 27 कसोटी, 398 वन डे आणि 99 टी 20 सामने खेळले. त्याने कसोटीत 1716 तर वन डे सामन्यात 8064 धावा आणि T20 मध्ये 1416 धावा केल्या आहेत.