टीम इंडियातील ५ खेळाडूंचा आज वाढदिवस
क्रिकेटमध्ये असे दिवस कमी असतात जेव्हा एकाच टीममधल्या ५-५ खेळाडूंचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. ६ डिसेंबर असा एकच दिवस जेव्हा टीम इंडियातील ५ खेळाडू एकाच दिवशी वाढदिवस साजरा करतात.
मुंबई : क्रिकेटमध्ये असे दिवस कमी असतात जेव्हा एकाच टीममधल्या ५-५ खेळाडूंचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. ६ डिसेंबर असा एकच दिवस जेव्हा टीम इंडियातील ५ खेळाडू एकाच दिवशी वाढदिवस साजरा करतात.
रवींद्र जडेजा :
६ डिसेंबर १९८८ जन्मलेल्या रवींद्र जडेजाने विराट कोहलीसोबत अंडर १९ वर्ल्ड कप खेळला आहे. त्याने २००९ मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
३ वर्षांनंतर त्याला टेस्ट खेळण्याची संधी मिळाली.
३४ टेस्ट मॅचमध्ये त्याने १६० विकेट घेतले तर ११६७ रन्स बनवले आहेत. १३४ वनडे मॅचमध्ये त्याने १५५ विकेट घेत १९१४ रन्स बनवले आहेत.
जसप्रीत बुमराह :
६ डिसेंबर १९९३ ला गुजरातच्या अहमदाबादमध्ये जन्मलेल्या बुमराहला यॉर्करचा मास्टर म्हटले जाते.
त्याने २८ वन डे मॅचमध्ये ५२ विकेट घेतले आहेत. ३० टी २० मॅचमध्ये ४० विकेट्स घेतल्या आहेत.
श्रेयश अय्यर :
मुंबईच्या श्रेयश अय्यरला अजूनही टीम इंडियात खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही. पण ४६ प्रथम श्रेणी मॅचमध्ये त्याने ५४ रन्स च्या सरासरीने ३९८९ रन्स बनविले आहेत. २०२ हा त्याचा सर्वश्रेष्ठ स्कोअर आहे.
करुण नायर :
६ डिसेंबर १९९१ मध्ये जोधपूरमध्ये जन्मलेल्या करुण नायरचे मूळ कर्नाटक आहे. त्रिशतक लगावणारा दुसरा बॅट्समन म्हणून करुण नायरची ओळख आहे.
करिअरच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्येच त्याने हा पराक्रम केला. टेस्ट मॅचमध्ये त्याला फारशी संधी मिळाली नाहीए.
आर.पी.सिंह
२००६ मध्ये क्रिकेट करिअरला सुरुवात करणाऱ्या उत्तरप्रदेशच्या आर.पी.सिंहने कमी वेळात मोठ नाव कमावल. २००६ मध्ये आपल्या डेब्यु टेस्ट मॅचमध्ये आरपीने जबरदस्त बॉलिंग करत मॅन ऑफ द चा पुरस्कार पटकावला.
त्याच्या पुढच्यावर्षात ७ विकेट घेऊन करिअरमधील सर्वोत्कृष्ट खेळ दाखवला. पण खेळात सातत्य नसल्याने तो टीम इंडियातून बाहेर आहे.