Virat Kohli Birthday : भारतीय क्रिकेट (Team India) संघाला एका उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) यानं त्याच्या कारकिर्दीत अपेक्षेहून मोठी उंची गाठली आणि फार कमी वयातच तो अनेकांच्या आदर्शस्थानी आला. (Virat Kohli in T20 world cup) विराट मैदानावर आला, की विरोधी संघाच्या खेळाडूंते धाबे दणाणतात. पण, याच विराटच्या मनाची भावनिक बाजू तुम्हाला माहितीये का? त्याच्या आयुष्यात खास स्थान असणाऱ्या व्यक्तींनी आतापर्यंत अनेकदा काही मुलाखतींमध्ये खरा विराट नेमका कसा आहे, यावरून पडदा उचलला होता. (Birthday special Virat Kohli a moment when cricketer broke emotionaly because of fathers death)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुद्द विराटनंच एकदा एक असा प्रसंग सांगितला होता ज्याविषयी ऐकून तुम्हीही स्तब्ध व्हाल. हा तोच प्रसंग होता ज्यावेळी विराटच्या वडिलांचं निधन झालं होतं. आयुष्यात सर्वकाही थांबल्याची जाणीव त्याला त्या क्षणी झाली. तिही इतकी की विराट जीवाच्या आकांतानं रडूही शकला नव्हता. तिथपासूनच संकटांशी लढण्याची सुरुवात विराटनं केली. 


वडिलांचं स्वप्न पूर्ण करणारा विराट (Virat kohli father death)


अमेरिकन पत्रकार ग्राहम बेनसिंगर यांच्याशी संवाद साधताना आपण वडिलांना शेवटच्या घटका मोजताना पाहिल्याचं म्हणत त्याला कंठ दाटून आला होता. तो दिल्लीसाठी खेळत असतानाच वडिलांनी अखेरचा श्वास घेतला होता. आपल्या लेकानं भारतीय संघासाठी खेळावं अशीच त्याच्या वडिलांची इच्छा होती आणि त्यांचं हे स्वप्न अखेर विराटनं पूर्ण केलं. 


जेव्हा विराटवर वाईट वेळ ओढावते... 


2006 ला जेव्हा विराट दिल्लीच्या संघाकडून रणजीमध्ये खेळत होता तेव्हाच डिसेंबर महिन्यात त्याच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला. पण, त्यानंतर आपण कोणत्याही कारणानं (Cricket) क्रिकेट सोडू शकत नवहो असं म्हणत हा खेळच माझ्यासाठी प्राधान्यस्थानी होता असं विराटनं स्पष्ट केलं होतं. वडिलांच्या निधनानंतर सर्वसामान्यांप्रमाणेच विराटनं प्रचंड वाईट परिस्थितीचा सामना केला होता. 


संपूर्ण कुटुंब रडत होतं, पण.... 


वडिलांचं निधन झालं, त्याच्या दुसऱ्याच दिवशी विराटला फलंदाजीसाठी मैदानात यायचं होतं. याविषयी सांगताना तो म्हणालेला, 'आम्ही रात्रभर जागे होतो. काहीच माहित नव्हतं. मी त्यांना अखेरच्या घटका मोजताना पाहत होतो. खूप उशिर झाला होता. डॉक्टरांकडेही नेलं, पण त्यांच्याकडे कुणीच पाहिलं नाही. त्यानंतर आम्ही त्यांना रुग्णालयात नेलं, पण तेव्हापर्यंच उशीर झाला होता'. कुटुंबातील प्रत्येकाला हुंदका दाटून आला होता, सर्वजण रडत होते. पण, विराटला हे सर्व नेमकं काय सुरुये याचाच अंदाज आला नव्हता. तो सुन्न झाला होता. 


अधिक वाचा : Happy Birthday Virat Kohli : 'रन मशीन' कोहली आज चाहत्यांना कोणतं गिफ्ट देणार? जाणून घ्या...


भावाला दिलं वचन... 


वडिलांच्या निधनाच्या प्रसंगाचा विराटवर मोठा परिणाम झाला. याविषयी सांगताना जड मनानं तो म्हणाला, 'मी सामन्यावरून परतल्यानंतर वडिलांवर अंत्यविधी झाले. तेव्हाच मी भावाला वचन दिलं, की मी भारतीय संघासाठी खेळणार. बाबांची तशीच इच्छा होती. त्या क्षणापासून इतर सर्व गोष्टी माझ्यासाठी मागे सरल्या. फक्त आणि फक्त क्रिकेट माझी प्राथमिकता ठरलं.'


नशिबानं जे हिरावलं त्याचं दु:ख करत राहण्यापेक्षा विराटनं भविष्याच्या दिशेनं वाटचाल केली आणि टप्प्याटप्प्यानं तो पुढे जात राहिला. नावाप्रमाणं त्यानं विराट कामगिरी करत क्रिकेटजगतात आपलं भक्कम स्थान निर्माण केलं.