नवी दिल्ली :  चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानाकडून पराभव स्वीकारला असला तरी या सामन्यात हार्दिक पंड्याने एक तुफानी खेली केली होती. या खेळीने भारतीयांच्या जखमेवर मलम लावण्याचे काम केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंड्याने ४३ चेंडूत ७६ धावा कुटल्या होत्या. त्याच्या या खेळीवर अनेक जण फिदा झाले होते. त्यात बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींचाही समावेश आहे. 


२३ वर्षीय पंड्याचे धडाकेबाज खेळीमुळे बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री त्याच्यावर फिदा झाल्या. यात सर्वात मोठे नाव आहे, माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन हिचे.... सुष्मिताने पंड्याच्या कौतुकाचा कळस गाठला. 



पंड्याच्या खेळीमुळे भारतात त्याचे अनेक चाहते झाले. त्यात सेलिब्रिटींचाही समावेश आहे. रणवीर सिंग, अर्चना विजय आणि गौहर खान यांनी पंड्याच्या खेळीमुळे ट्विट केले. पण सुष्मिता सेन हिने पंड्यासाठी असं काही केलं की फॅन्स हैराण झाले. तिने हार्दिकशी प्रेमाची कबुली दिली. एवढेच नाही तर तिने I love You चा मेसेजही ट्विटमध्ये टाइप केला. या शिवास सौनल चौहन, सोफिया चौधरी आणि रितेश देशमुख अशा अनेक सेलिब्रिटींनी हार्दिकला ट्विट करून अभिनंदन केले.