मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची हाक दिल्यानंतर सर्वत्र नागरिकांनी घरातच राहत Coronavirus कोरोना विषाणूविरोधात सुरु असणारा लढा लढण्यास सुरुवात केली. सावधगिरी बाळगण्याला प्रत्येकानेच प्राधान्य दिलं. अगदी कला आणि क्रीडा क्षेत्रातही मोदींच्या या निर्णयानंतर सर्व व्यवहार बंद करण्यात आले. परिणामी सध्याच्या घडीला सर्वच सेलिब्रिटी मंडळी ही आता आपआपल्या घरामध्ये कुटुंबीयांसमवेत हा वेळ व्यतीत करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांनाच हे होम क्वारंटाईन आव्हानात्मक वाटत असताना काही मंडळी मात्र या क्षणांमध्येही आनंदी राहत आहेत. अशाच मंडळींमध्ये येणारी एक जोडी म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती, क्रिकेटपटू विराट कोहलीची. 


'विरुष्का' सध्या 'होम क्वारंटाईन' असून, या काळातही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या आणि मित्रमंडळींच्या संपर्कात असणाऱ्या या जोडीच्या आयुष्यात सध्या काय सुरु आहे याची प्रतिची नुकतीच आली. 


इंग्लंडचा फलंदाज केविन पीटरसन याच्याशी इन्स्टाग्रामवरून लाईव्ह व्हिडिओ सेशनदरम्यान संवाद साधत विराटने बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये अनुष्काने व्यत्यय आणत धमाकेदार एंट्री केली. ज्याची माहिती खुद्द पीटरसननेच दिली. लाईव्ह चॅटदरम्यान, 'चलो.... डिनर टाईम...' अर्थात, 'चला आता जेवायची वेळ झाली' अशी कमेंट करत अनुष्काने या दोन्ही खेळाडूंच्या चॅटला काहीसं विनोदी वळण दिलं. 



 


पीटरसनने याच कमेंटचा फोटो पोस्ट करत त्यासोबत कॅप्शन देत लिहिलं, 'जेव्हा बॉस सांगतात वेळ संपली आहे; तेव्हा ती वेळ संपलेलीच असते.' त्याची ही पोस्ट पाहता आणि अनुष्काची कमेंट पाहता 'बिवी बिवी होती है....' अशीच प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी देत विराटची थट्टा केली आहे.