बॉम्बे टू गोवा! Arjun Tendulkar ला का घ्यावा लागला इतका मोठा निर्णय?
अर्जुन आता मुंबईचा संघ सोडणार आहे.
मुंबई : नुकतंच सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने एक मोठा निर्णय घेत चाहत्यांना मोठा धक्का दिलाय. अर्जुन आता मुंबईचा संघ सोडणार आहे. यापुढे तो गोव्याच्या टीमकडून खेळताना दिसण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय.
मुळात 2020-21 मध्ये अर्जुन सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील दोन सामने खेळला होता. मात्र या वर्षी त्याला एकही संधी न देता टीमबाहेर बाहेर केलं होतं. पण अर्जुनने मुंबई क्रिकेट संघटनेकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितले होतं. त्यामुळे अर्जुन आता मुंबईची टीम सोडणार असल्याचे स्पष्ट झालंय.
दरम्यान नुकतंच अर्जुनला मुंबई क्रिकेट संघनेनेकडून ना हरकत प्रमाणपत्र दिल्याची माहिती मिळालीये. त्यामुळे अर्जुनचा दुसऱ्या टीमकडून खेळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय.
का घेतला अर्जुनने असा निर्णय?
अर्जुन तेंडुलकर हा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे, अशा परिस्थितीत त्याच्यावर वडिलांच्या नावाचा खूप दबाव आहे. प्रत्येकाला त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असते. मात्र असंही प्रदर्शित केलं जाऊ शकत नाही की, तो सचिनचा मुलगा आहे म्हणून टीममध्ये त्याची निवड केली जातेय.
कदाचित हेच कारण असू शकतं, जिथे मुंबईशिवाय अर्जुन गोव्यासाठी खेळला तर त्याला आपला ठसा उमटवण्याची संधी मिळेल. रणजी ट्रॉफी व्यतिरिक्त, अर्जुन तेंडुलकर इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून देखील खेळतो. मात्र या दोन्ही सिझनमध्ये त्याला टीममध्ये संधी देण्यात आली नाही.