नवी दिल्ली : टीम इंडिया ही वेगवान गोलंदाजीत नेहमीच कमकुवत ठरली आहे. भारत कधीही यामध्ये त्याची ओळख नाही बनवू शकला. पण आता परिस्थिती बदलत आहे. युवा पिढी आता वेगवान गोलंदाजीमध्ये जगाच्या समोर स्वत:चं टॅलेन्ट ठेवत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानच्या जलदगती गोलंदाजाने न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या अंडर १९ आयसीसी विश्वचषकात आपलं टॅलेन्ट जगासमोर ठेवलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या पहिल्या सामन्यात या गोलंदाजाने ज्या वेगाने गोलंदाजी केली ते पाहिल्यानंतर क्रिकेटमधील मोठे मोठे दिग्गज देखील हैराण झाले. हा युवा वेगवान गोलंदाजाविषयी आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.


१४९ किलोमीटर वेगाने गोलंदाजी


भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने बीसीसीआय आणि विराट कोहली यांनाही या गोलंदाजावर लक्ष ठेवण्यासाठी सांगितले आहे. या युवा गोलंदाजाचे नाव कमलेश नागरर्कोटो आहे. ज्याने अंडर १९ विश्वचषकात १४९ किलोमीटर वेगाने गोलंदाजी केली.


कमलेशचे वडील लच्छम सिंग आपल्या मुलाच्या यशाबद्दल खूप आनंदी आहेत आणि त्यांना कमलेशला भारतीय संघाच्या जर्सीमध्ये पाहायचं आहे. कमलेशच्या वडिलांनी झी मिडियासोबत बोलतांना मुलाच्या यशाचं आणि जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या.


कमलेश नागरकोटीचे वडील लक्षम सिंग हे डिसेंबर 2014 मध्ये भारतीय लष्कराकडून सन्माननीय कॅप्टन पदावरून निवृत्त झाले. कमलेश लष्करी विद्यालयातून शिकला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये प्रचंड शिस्त आहे. कमलेश नागरकोटीला तीन भावंड आहेत, ज्यामध्ये कमलेश सर्वात लहान आहे. कमलेशचे मोठे भाऊ विनोदसिंग नगरकोटी क्रिकेट खेळतात. अकादमीमध्ये ते प्रशिक्षक म्हणून आहेत.


कोठून घेतले क्रिकेटचे धडे


कमलेशच्या वडिलांनी सांगितले की, सुरुवातीला तो राजस्थानमधील बाडमेरमध्ये खेळत होता, परंतु 2004 साली ते जयपूरला गेले, ते संपूर्ण कुटुंबासह येथे आले. कमलेशने जयपूर येथे खेळण्यास सुरुवात केली. कमलेश आर्मीच्या शाळेतून शिक्षण घेतले आहे. त्याचबरोबर कमलेशने संस्कार क्रिकेट अकादमीत प्रवेश घेतला. येथून त्याने क्रिकेटचे धडे घेतले.


कमलेशने सात वर्षांपासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यावेळी कमलेशचे प्रशिक्षक सुरेंद्र सिंग राठोड लष्कराच्या छावणीत आले होते. त्याने कमलेशला खेळतांना बघितले आणि सांगितले की हा मुलगा जादू आहे. हा काहीतरी बनू शकतो. यानंतर कमलेशने संस्कार क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश केला."


कमलेशला सुरुवातीपासूनच गोलंदाजी करायची होती. मात्र, त्याला फलंदाजी देखील येत होती. परंतु गोलंदाजीमध्ये तो वेगवान होता. त्यामुळे त्याने वेगवान गोलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित केले.


कमलेश जलद गोलंदाजीसाठी तयार आहे. कमलेश आणि त्याचे प्रशिक्षक राठोड यांचे संबंध वडील व मुलासारखेच आहेत. प्रशिक्षक आणि विद्यार्थ्याप्रमाणे नाही. राठोड म्हणतात की, त्याचे अॅक्शन त्याच्या शरीराला खूप सपोर्ट करते. म्हणून तो लहान वयापासूनच वेगवान गोलंदाजी करतो.


कमलेशचे प्रशिक्षक सुरेंद्र राठोड यांनीही रणजी क्रिकेट खेळली आहे. ते मध्यम वेगवान गोलंदाज होते. जेव्हा कमलेश खेळत होता तेव्हा त्यांनी त्याला पाहिले आणि सांगितले होते की, तुझ्या बॉलिंगमध्ये वेग आहे. तू यामध्ये काहीतरी बनू शकतो. यानंतर त्यांनी कमलेशच्या गोलंदाजीकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली.


अंडर-23 चाही होता भाग


कमलेश नागरकोटी यांने अंडर-14 मध्ये, अंडर -16 आणि अंडर-19 मध्ये राजस्थानचे प्रतिनिधित्व केले आहे. कमलेशने राहुल द्रविडला प्रचंड प्रभावीत केले आहे. कमलेशने राहुलवर इतका प्रभाव टाकला होता की त्याने बांगलादेशच्या दौऱ्यातील अंडर 23 संघातही त्याला समाविष्ट केले होते.


कमलेशचे वडील सांगतात की,  "क्रिकेटबाबत लहानपणापासून कमलेशमध्ये उत्साह होता. कमलेश पावसाळ्यात संपूर्ण दिवस खेळत असत. जर त्याला एखादा जोडीदार नाही सापडला तर तो दिवसभर झाडाला बॉल बांधून खेळायचा. सोबत एक पाण्याची बाटली घेऊन जायचा. ती संपली की तो पुन्हा घरात यायचा, भरायचा आणि पुन्हा खेळण्यासाठी निघून जायचा.


कमलेशला नेहरा सारखं बनायचंय


कमलेश आशिष नेहरा आणि मोहम्मद शमी यांना आदर्श मानतो. आपल्या प्रत्येक मुलाखतीत कमलेश म्हणतो की, आशिष नेहराने ज्या स्पीडने करिअरची सुरुवात केली होती त्याच स्पीडने 36 वर्षांत तो निवृत्त झाला. कमलेश केवळ नेहराची गतीच नव्हे तर फिटनेसही प्रभावित आहे. मोहम्मद शमीच्या लाईन आणि लेंथने ही तो फार प्रभावित आहे. जर भारताबाहेरच्या गोलंदाजाबाबत बोलायचं झालं तर तो पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अकरमशली ही खूप प्रभावित आहे.


मुलाने सीनियर टीम इंडियामध्ये खेळावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा आहे. ते म्हणतात की, मी देवाला प्रार्थना करतो की माझा मुलगा टीम इंडियामध्ये खेळावा आणि देशाचे आणि राज्याचे नाव रोशन करावे. आम्ही फक्त कमलेशला असे म्हटले आहे की तू विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करतोय तसंच यापुढे ही करत राहा.


विराट कोहलीसोबत खेळण्याची इच्छा


कमलेश नरगाकोटीचे वडील सांगतात की, कमलेशची फक्त एकच इच्छा आहे ती म्हणजे विराट कोहलीबरोबर त्याला खेळायचं आहे. कमलेशला राहुल द्रविडकडून बरेच काही शिकायला मिळाले. ते लहान-लहान गोष्टी सांगतात ज्यामुळे खूप काही शिकायला मिळतं.