मुंबई : झिम्बाव्वे विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये दुसरा एकदिवसीय सामना रविवारी खेळवण्यात आला. हा सामनाही बांगलादेशने जिंकत सिरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र सामन्यात लोकांची नजर गेली ती झिम्बाब्वेच्या कर्णधाराच्या चुकीकडे. झिम्बाब्वेचा कर्णधार ब्रेंडन टेलर स्वतःच्याच चुकीमुळे त्याची विकेट गमावून बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान झिम्बाब्वे बॅंटीग करत असताना 25 व्या ओव्हरमध्ये ब्रेंडन टेलर एका विचित्र शॉट मारल्यावर आऊट झाला. यावर अनेकांचा विश्वास ठेवणंही कठीण झालंय. झालं असं की, बांगलादेशाचा वेगवान गोलंदाज शोरिफुल इस्लामच्या बोलिंगवर झिम्बाब्वेचा कर्णधार ब्रेंडन टेलरने अप्पर कट चुकवला आणि चेंडू बाहेर गेल्यानंतर टेलरने या शॉटचा सराव करताना बॅटला मागे केली असता ती थेट जाऊन स्टंपला लागली.


यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंच्या अपीलनंतर ऑन-फील्ड अंपायर्सने हा निर्णय तिसर्‍या पंचांकडे पाठवला. आणि त्यांनी ब्रेंडन टेलरची ही विकेट हिट विकेट म्हणून दिली. ब्रेंडन टेलरच्या आऊट झाल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 



क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदा घडलेलं नाहीये. यापूर्वी 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज मार्क वॉनेही दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात अशाच प्रकारे विकेट गमावली होती.