मुंबई : आयपीएल २०१८चा हंगाम संपलाय. रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात चेन्नईने हैदराबादला ८ विकेट राखून हरवले. दोन वर्षानंतर पुनरागमन करणाऱ्या चेन्नईने संपूर्ण आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली. दोन वर्षात पुनरागमन करणाऱ्या चेन्नईने तिसऱ्यांदा हा खिताब जिंकलाय. याआधी २०१० आणि २०११मध्ये आयपीएलचे जेतेपद मिळवले होते. यासोबतच आयपीएलचे सर्वाधिक जेतेपद जिंकणाऱ्या चेन्नईने मुंबईशी बरोबरी साधलीये. दोन्ही संघांनी तीन-तीन वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवलेय. चेन्नईचे नाव आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी संघ म्हणून घेतले जाते. चेन्नई संघ सातव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला होता.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामना सुरु होण्याआधी आयपीएलच्या क्लोझिंग सेरेमनीमध्ये क्रिकेटरर्ससह अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. आयपीएलच्या फायनलआधी बॉलीवूड अभिनेत्री एली अवरामने डान्स फ्लोरवर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ब्रेट ली आणि भारताचा ऑलराऊंडर इरफान पठाणसोबत धमाल मस्ती केली.