मुंबई : भारतीय संघ (Team India) सध्या ऑस्ट्रेलियाच्या (Australia) एडिलेड (Adelaide) मध्ये सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) च्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये व्यस्त आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या सामन्यानंतर भारतात परतत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांतच अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आपल्या बाळाला जन्म देईल. यावेळी विराटला अनुष्कासोबत राहायचं आहे. विराट सीरिजमधील इतर ३ टेस्ट सामन्यात गैरहजर राहणार आहे. 


ब्रेटलीने दिली खास ऑफर 


विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर आणि आताचा कमेंटेटर ब्रेट ली (Brett Lee) या कपलला खास ऑफर दिली आहे. 


ब्रेट ली म्हटलंय की, 'मिस्टर कोहली, जर तुम्हाला वाटतं असेल तर ऑस्ट्रेलियात बाळाला जन्म देऊ शकता. आम्ही ऑस्ट्रेलियात तुमच्या बाळाचं स्वागत करू. मुलगा झाला तरी चालेल आणि मुलगी झाली तर चांगलच आहे.'


जानेवारीत देणार बाळाला जन्म 


जानेवारीत २०२१ मध्ये अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आपल्या बाळाला जन्म देणार आहे. सोशल मीडियावर अनुष्काने ही माहिती दिली. जानेवारीत आम्ही दोघांचे तीन होणार आहोत असं सांगितलं. अनुष्का या महिन्यात ८ महिन्यांची गरोदर आहे. बेबी बंपसह अनुष्का मुंबईत दिसली. सध्या अनुष्का विराट मुंबईत येण्याची वाट पाहत आहे.