Viral Video: RCB च्या फॅनने केला Brett Lee च्या गाडीचा पाठलाग; त्यानंतर जे काही झालं... तुम्हीच पाहा
RCB Fan Selfie with Brett Lee: एका क्रेझी आरसीबी फॅनचा (RCB Fan Video) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं दिसत आहे. बुधवारी रात्री एक प्रकार घडला. झालं असं की...
Brett Lee Share Video Of RCB fans: सेल्फीसाठी काहीपण, असं आता म्हणण्याची वेळ सोशल मीडियामुळे (Social Media) आली आहे. सोशल मीडियावर चमकण्यासाठी अनेकजण सेलिब्रेटींसह सेल्फी घेण्यासाठी उत्सुक असतात. स्टार क्रिकेटसोबत फोटो काढला तर पोराची गावभर चर्चा. अशातच एका क्रेझी आरसीबी फॅनचा (RCB Fan Video) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं दिसत आहे. बुधवारी रात्री एक प्रकार घडला.
बुधवारी रात्री एका भारतीय क्रिकेट चाहत्याने सेल्फीसाठी ब्रेट लीच्या (Brett Lee) कारचा बराच वेळ पाठलाग केला. ब्रेट लीने (Brett Lee Share Video Of RCB fans) हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. रस्त्याने चालत असताना ब्रेट ली आणि आरसीबी फॅनमध्ये संभाषण झालं. त्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय.
नेमकं काय आहे व्हिडिओ?
बंगळुरूचा सामना संपल्यानंतर आरसीबीच्या या चाहत्याने ब्रेट लीला पाहताच त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा हट्ट सुरू केला. हा पठ्ठ्या ब्रेट लीच्या कारचा पाठलाग करत होता. ते ही अॅक्टिवावर.. गाडीचा स्पीड खूप होता. अशा परिस्थितीत ब्रेट लीने सर्वप्रथम या चाहत्याला आरामात गाडी चालवण्यास सांगितलं.
आणखी वाचा - Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह World Cup 2023 खेळणार ? BCCI ने स्पष्टच उत्तर दिलं!
सर, मी तुमचा मोठा फॅन आहे. कृपया मला एक सेल्फी द्या, असं फॅन वारंवार ब्रेट लीला सांगत होता. त्यावेळी ब्रेट लीने त्याला आरामात गाडी चालवण्यास सांगितलं. मात्र, त्याने हट्टच धरला. नाय नाय, मला आज तुझ्यासोबत एक सेल्फी काढायचाय, असं म्हणत त्याने ब्रेट लीचा पाठलाग काही सोडला नाही.
पाहा Video -
दरम्यान, तुझं हेल्मेट कुठं आहे, अशी विचारणा ब्रेट लीने फॅनला केली. त्यानंतर त्याने सेल्फी दिल्याची माहिती देखील मिळाली आहे. ब्रेट लीने हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. भारतात मला नेहमी अनोखे सरप्राईम मिळत आहे, असं म्हणत ब्रेट लीने आनंद व्यक्त केला आहे.