WWE: ब्रोक लेस्नरच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी
लेस्नर आणि कंपनीच्या नव्या करारानुसार लेस्नर २०१८मध्ये समरस्लॅममध्ये उतरण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली :'WWE'च्या त्यातही ब्रोक लेस्नरच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आणि तितकीच दु:खदायक बातमी आहे. आपल्या हटके स्टाईलने 'WWE'विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा हेविवेट रेसलर ब्रोक लेस्नर 'WWE'मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. सूत्रांकडील माहितीनुसार, ब्रोक आपले युनिवर्सल टायटल गमावण्याची चिन्हे आहेत. सध्या 'WWE' आणि लेस्नर यांच्यात केवळ फाईट डील झाली आहे. ज्यामुळे समरस्लॅमनंतर लेसनरच्या करिअरवर प्रश्नचिन्ह उभे राहू शकते. दरम्यान, 'WWE'मधून बाहेर पडल्यावर लेस्नर UFC सोबत जोडला जाण्याची शक्यता आहे.
लेस्नरचा सामना कोणाशी?
दरम्यान, आतापर्यंत हे समजू शकले नाही की, समरस्लॅममध्ये लेस्नरचा सामना कोणासोबत होणार आहे. मात्र, हा सामना होणार हे नक्की. माजी UFC हेविवेट चँपीयन लेस्नरने रेसलमेनिया ३३ मध्ये गोल्डबर्गला पराभूत करत यूनिव्हर्सल चँम्पीयनशीपवर नाव कोरले होते. ब्रोक लेस्नरने सन २०१२मध्ये 'WWE'मध्ये पुनरागमन करत पार्ट टाईम रेसलरच्या रूपात काम केले आहे. याच काळात त्याने युनिवर्सल टायटलही जिंकले. दरम्यान, लेस्नरसाठी कंपनी ('WWE') भविष्यात काय मार्ग आखते यावरचा पडदा अद्याप उठला नाही. दरम्यान, ब्रोक लेस्नर आता रॉमध्ये कधी पुनरागमन करतो आणि आपला प्रतिद्वंद्वी निवडतोय याबाबत उत्सुकता आहे.
लस्नरचा प्लान काय?
ब्रोक लेस्नर जर समरस्लॅमनंतर 'WWE' सोडत असेल तर, पॉल हेमनकडूनही याच नियमांचे पालन करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 'WWE'जवळ सध्या तरी रेमनसाठी कोणताही प्रस्ताव नाही. पण, बीस्ट एडव्होकेट नंतर हेमनला दुसरी एखादी भूमिका मिळू शकते. चर्चा आहे की, लेस्नर आणि कंपनीच्या नव्या करारानुसार लेस्नर २०१८मध्ये समरस्लॅममध्ये उतरण्याची शक्यता आहे.