मुंबई : ऍशेसच्या पहिल्या टेस्टमध्ये स्टिव्ह स्मिथनं लगावलेल्या शतकामुळे ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत पोहोचली आहे. स्मिथच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाला २६ रन्सची आघाडी मिळाली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं ३३ रन्सवर २ विकेट गमावल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडनं पहिल्या इनिंगमध्ये ३०२ रन्स बनवल्यानंतर ऑस्ट्रेलियाची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. पण स्मिथनं टेस्ट क्रिकेटमधलं त्याचं २१वं शतक झळकावलं. टेस्ट क्रिकेटमधलं स्मिथचं हे सगळ्यात संथ शतक होतं. शतक पूर्ण करायला स्मिथला २६३ बॉल्स लागले. याआधी स्मिथनं भारताविरुद्धच्या टेस्टमध्ये २२७ बॉल्समध्ये शतक केलं होतं.


सचिनचं रेकॉर्ड मोडलं


स्मिथचं टेस्ट क्रिकेटमधलं हे सगळ्यात संथ शतक असलं तरी त्यानं सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड मोडलं आहे. स्मिथनं १०५ इनिंगमध्ये २१ शतकं लगावली आहेत. सचिन तेंडुलकरला २१ शतकं लगावायला ११० इनिंग लागल्या होत्या. सगळ्यात जलद २१ शतकं ब्रॅडमन यांनी ५६ इनिंगमध्ये बनवली होती तर गावसकर यांना ९८ इनिंग लागल्या होत्या. पाकिस्तानच्या मोहम्मद युसुफनं ११० इनिंगमध्ये २१ शतक लगावली होती.


स्मिथ आता फक्त ब्रॅडमनच्या मागे


कॅप्टन असताना सर्वाधिक शतक झळकवणाऱ्यांच्या यादीत स्मिथनं श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेशी बरोबरी केली आहे. स्मिथ आणि जयवर्धनेनं कॅप्टन असताना ४८ इनिंगमध्ये १३ शतकं केली होती. या यादीमध्ये ब्रॅडमन पहिल्या क्रमांकावर आहेत. ब्रॅडमन यांनी ४८ इनिंगमध्ये १४ शतकं लगावली होती.