मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी वादात अडकलेाल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि सलामीचा फलंदाजी कॅमेरुन बेनक्राफ्टच्या भविष्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. आयसीसीने या वादामुळे स्मिथवर एका सामन्याची बंदी घातलीये. तर बेनक्राफ्टच्या खात्यात तीन निगेटिव्ह मार्क देण्यात आलेत. स्मिथवर १०० टक्के मॅच फीचा दंड तर बेनक्राफ्टवर ७५ टक्के मॅच फीचा दंड ठोठावण्यात आलाय. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर बेनक्राफ्टने पिवळ्या रंगाच्या टेपने बॉलशी छेडछाड केली होती. ही गोष्ट नंतर कर्णधार स्मिथने स्वीकारली तसेच ही संघाची योजना होती. यात टीमचा लीडरशिप ग्रुप सामील होता असे त्याने यावेळी कबूल केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे प्रकरण ताजे असतानाच ऑस्ट्रेलियन क्रिकेटला आणखी एक झटका बसलाय. एका वेबसाईटवर व्हिडीओ अपलोड करण्यात आलाय. यात ऑस्ट्रेलियाचा ओपनर कॅमेरुन बेनक्राफ्ट त्याच्या खिशात एक चमचा साखर टाकताना दिसतोय. हे प्रकरण अॅशेस सीरिजदरम्यान इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान घडलेय.



हा व्हिडीओसह सनचे रिपोर्टर डेविड कावर्डले यांनी ट्विट केले. हा कॅमेरुन बेनक्राफ्ट आहे जो जानेवारीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान खिशात साखर टाकताना दिसतोय. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे फुटेज स्पष्टपणे दिसतंय. या व्हिडीओबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाहीये. 



हे आहे प्रकरण


द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात केपटाऊन येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीदरम्यान ही घटना घडली. आफ्रिका फलंदाजी करत होत. ३४वे षटक सुरु होती. यावेळी मार्करम आणि एबी डे विलियर्स खेळत होते. त्याचवेळी बेनक्राफ्ट एका चिपसारख्या वस्तूसकट कॅमेऱ्यात कैद झाला. सुरुवातीला ही बॉल चमकवण्यासाठी चिप असल्याचे सांगितले गेले. त्याने ती चिप बॉलवर घासली. दरम्यान, यावेळी अंपायरने बेनक्राफ्टला हटकले. तसेच अंपायरसमोर येण्यासाठी बेनक्राफ्टने पिवळ्या रंगाची वस्तू अंतवस्त्रात ठेवताना अंपायरने पाहिले होते. जेव्हा अंपायर त्याच्याकडे पोहोचले तेव्हा त्यांनी ब्रेनकाफ्टच्या पँटचा खिसा चेक करुन पाहिला. यावेळी खिशात अनेक वस्तू होत्या. यानंतर कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि बेनक्राफ्टने याप्रकरणी आपली चूक मान्य केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्मिथने बॉल टेंपरिंगचे प्रकरणाची जबाबदारी घेतली. तसेच बेनक्राफ्टनेही बॉल टेंपरिंग केल्याचे मान्य केले. 


ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली नाराजी


ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या या वर्तनामुळे ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनीही नाराजी व्यक्त केलीये. ही शरमेची घटना असल्याचे पंतप्रधान मेल्कोन टर्नबुल यांनी म्हटलंय.