IPL 2024 Points Table Mumbai Indians Scenario: आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमची हालत फारशी चांगली नसल्याचं दिसून येतंय. यंदाच्या सिझनमध्ये मुंबईचे 3 सामने झाले असून एकाही सामन्यात मुंबईला विजय मिळवता आलेला नाहीये. त्यामुळे सिझनच्या सुरुवातीच सामने हरल्यामुळे टीमच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईच्या टीमसाठी प्लेऑफचं समीकरण काहीसं कठीण असल्याचं दिसून येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या सिझनमधील पहिले तीन सामने गमावल्यानंतर टीमच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मुंबई इंडियन्स आता आयपीएलमधून बाहेर पडेल की काय, अशीही काही समीकरणे तयार होतायत. आयपीएलच्या लीग टप्प्यात प्रत्येक टीम 14 सामने खेळते. म्हणजेच मुंबईच्या टीमसाठी अजून 11 सामने बाकी आहेत. पण इतर टीमचा खेळ पाहिला तर मुंबईसाठी प्लेऑफचा मार्ग सोपा नसणार आहे, हे दिसून येतंय.


कसा असेल मुंबईचा प्लेऑफ गाठण्याचा मार्ग?


यंदाच्या आयपीएलमध्ये 16 किंवा त्याहून अधिक पॉईट्स असलेल्या टीम प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला आता उर्वरित 11 सामन्यांमध्ये 7 विजय नोंदवावे लागतील. याशिवाय मुंबई इंडियन्सला त्यांचा नेट रन रेट सुधारावा लागणार आहे. अशातच हार्दिक पंड्या हा सोशल मीडियावर सातत्याने टीकाकारांच्या निशाण्यावर असतो. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये मुंबईला विजय मिळवणं गरजेचं आहे. 


मुंबई इंडियन्समध्ये असताना हार्दिक पांड्याला लोकांनी डोक्यावर उचललं. त्यानंतर तो गुजरात टायटन्सचे नेतृत्व करु लागला. तेव्हा मुंबईचे चाहते थोडे नाराज झाले पण तरीही काही अडचण नव्हती. पण आता मुंबई टीममध्ये रोहित शर्मा असताना कॅप्टन म्हणून आलेला पांड्या चाहत्यांच्या पचनी पडला नाही. चांगली टीम, कॅप्टन्सी, महागडा खेळाडुचा टॅग असं सर्वकाही पांड्याकडे आहे. पण चाहत्यांचं प्रेम? हे त्याला अजून अद्याप जिंकता आलं नाहीये.


मुंबई इंडियन्स आपल्या दमदार बॅटींगसाठी ओळखली जाते. हार्दिक पांड्या खूप चांगला फिनिशर आहे. पण सध्या त्याला टाईम साधता येत नाहीय. तो जुळून आल्यास तो टीकाकारांना गप्प करु शकतो. रोहित शर्माच्या अनुभवाचा आणि लोकप्रियतेचा हार्दिक पांड्याने टीमसाठी फायदा करुन घ्यायला हवा. कॅप्टन्सी बदलून टीमला फायदा होणार असेल तर टीम मॅनेजमेंटने यावर नक्की विचार करायला हवा, असे मत चाहते व्यक्त करत आहेत.