Rohit Sharma: पाकिस्तानविरूद्ध कर्णधाराची चाणक्य नीती; रोहितच्या `या` निर्णयांनी जिंकवला हरलेला सामना
Rohit Sharma Crucial Decision In IND va PAK Match: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने असे काही निर्णय घेतले, ज्यामुळे पाकिस्तानविरूद्धची हरलेली बाजी भारताने जिंकली.
Rohit Sharma Crucial Decision In IND va PAK Match: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2024 चा टी-20 वर्ल्डकप खेळतेय. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये असून आतापर्यंत टीमने 2 सामने जिंकले आहे. रविवारी झालेल्या भारत विरूद्ध पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्यात 6 रन्सने टीम इंडियाने बाजी मारली. मात्र टीम इंडिया हा सामना गमावणार का अशी आशा वाटत होती. परंतु टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने असे काही निर्णय घेतले, ज्यामुळे पाकिस्तानविरूद्धची हरलेली बाजी भारताने जिंकली.
या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉसपूर्वी पाऊस होता, त्यामुळे टॉस जिंकणाऱ्या टीमची गोलंदाजी निश्चित होती. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांनी चांगलंच अडचणीत आणलं. या सामन्यात भारताच्या फलंदाजांना पूर्ण 20 ओव्हर्स देखील खेळता आल्या नाहीत. भारतीय फलंदाज 119 रन्समध्ये ऑलआऊट झाले. या ठिकाणी भारताचा पराभव जवळपास निश्चित वाटत होता, मात्र कर्णधार रोहित शर्माने काही चलाखीचे निर्णय घेत
टीमला विजय मिळवून दिला.
रोहित शर्माच्या या निर्णयांनी पलटला डाव
फखर झमानविरूद्ध स्पिन गोलंदाजी केली नाही
पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज फखर झमान हा मोठे शॉट खेळण्यासाठी ओळखला जातो. फखरने येताच स्पिनर गोलंदाज अक्षर पटेलला सिक्सर मारला. फखरला फिरकीपटूंना कसं खेळायचे हे चांगलं ठाऊक आहे. पण जोपर्यंत फखर क्रीजवर राहिला तोपर्यंत रोहित शर्माने वेगवान गोलंदाजांना गोलंदाजी दिली. यानंतर हार्दिक पांड्याने त्याला बाउन्सर टाकत बाद केलं. रोहितची ही युक्ती एकदम परफेक्ट होती.
हार्दिक पंड्याला संपूर्ण 4 ओव्हर्स दिल्या
भारत विरूद्ध पाकिस्तान हा सामना न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. ज्याठिकाण वेगवान गोलंदाजांना खूप चांगली मदत मिळाल्याचं दिसून आलं. पीच लक्षात घेता रोहित शर्मासह तीन मुख्य वेगवान गोलंदाज (बुमराह, सिराज आणि अर्शदीप) यांनीही हार्दिक पांड्याला 4 ओव्हर्स टाकायला दिली. हार्दिकने यावेळी चांगली गोलंदाजी करत 4 ओव्हर्समध्ये 24 रन्स देत 2 विकेट्स घेतले. उर्वरित 2-2 ओव्हर्स जडेजा आणि अक्षरने टाकली.
डेथ ओव्हरमध्ये बुमराहकडून केली गोलंदाजी
दुसऱ्या सत्रात गोलंदाजी करताना 19 वी ओव्हर फार महत्त्वाची मानली जाते. सामना कोण जिंकणार हे 19व्या ओव्हरमध्ये जवळपास निश्चित होतं. भारतीय कर्णधार रोहित शर्माने या ओव्हरसाठी जसप्रीत बुमराहला गोलंदाजी दिली. बुमराहने 19 वे ओव्हर टाकली ज्यात त्याने फक्त 03 रन्स दिले. या काळात त्याने 1 विकेटही घेतली. बुमराह जेव्हा 19 वे षटक टाकायला आला तेव्हा पाकिस्तानला विजयासाठी 2 ओव्हर्समध्ये 21 रन्सची गरज होती. पण केवळ 3 धावा टाकल्यानंतर बुमराहने भारताला सामना जवळजवळ मिळवून दिला.