डरबन : कॅप्टन फॅप डुप्लेसिसनं लगावलेल्या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेला पहिल्या वनडेमध्ये सावरलं आहे. दक्षिण आफ्रिकेनं ५० ओव्हर्समध्ये २६९/८ एवढा स्कोअर केला. डुप्लेसिसनं ११२ बॉल्समध्ये १२० रन्स केल्या. डुप्लेसिसच्या या खेळीमध्ये ११ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता.


टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीपासूनच धक्के लागले. पण डुप्लेसिसनं पहिले क्विटन डीकॉक(३४), क्रिस मॉरिस(३७) आणि पेहलुक्वायोच्या मदतीनं दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. एकवेळी दक्षिण आफ्रिकेची अवस्था १३४-५ अशी होती. भारताकडून कुलदीप यादवनं ३, युझवेंद्र चहलनं २ आणि बुमराह-भुवनेश्वर कुमारनं प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. 


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा