मुंबई : भारत आणि वेस्टइंडिजमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने 8 रन्सने विजय मिळवला. मात्र या सामन्यात भारताची ढिसाळ फिल्डींग पहायला मिळाली. फिल्डींगमुळे सामना हातातून जाण्याची वेळंही आली होती. टीम इंडियाने या सामन्यात अनेक महत्त्वाचे कॅच सोडले. दरम्यान खेळाडूंची फिल्डींग पाहिल्यानंतर रागाच्या भरात एक कृत्य केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्टइंडिज खेळत असताना 16व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमार गोलंदाजी करत होता. त्यावेळी वेस्ट इंडिजचा रॉवमॅन पावेलने एका मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल जास्त दूर न जाता पिचजवळच राहिला. यावेळी भुवनेश्वरने तो कॅच घ्यायला हवा होता. मात्र तसं झालं नाही. 


एक उंच मात्र सोपा कॅच भुवनेश्वरने सोडून दिला. मुख्य म्हणजे त्यावेळी बाजूलाच कर्णधार रोहित शर्मा कॅच घेण्यासाठी उभा होता. मात्र भुवनेश्वने तो कॅच सोडला त्यावेळी रोहितची रिएक्शन पाहण्यासारखी होती. यावेळी रागाच्या भरात रोहितने बॉलला जोरदार लाथ मारली.



रोहितच्या या चुकीचा फटका भारताला भोगावाही लागला. कारण रोहितने जेव्हा बॉलला लाथ मारली त्यावेळी बॉल फार दूर गेला. तेव्हा वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी एक रन धावून काढला. 
 
सामन्यानंतर रोहित म्हणाला, "आमची फिल्डींग काही प्रमाणात कमकुवत राहिली. यामुळे थोडी निराशा झाली. जर आम्ही चांगली फिल्डींग करत कॅच पकडले असते तर खेळाचं चित्र पालटलं असतं."


शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर 8 धावांनी विजय मिळवला आहे. रोहित सेनेने विंडिजला विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र विंडिजला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 178 धावाच करता आल्या. या विजयासह टीम इंडियाने मालिकाही जिंकली आहे.