Rohit Sharma on Suryakumar Yadav: रविवारी विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात (IND vs AUS 2nd ODI) ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला. लाजीरवाण्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने मालिका 1-1 ने बरोबरी साधली आहे. पराभवानंतर कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) माध्यमांना समोरं गेला. त्यावेळी त्याने पराभव निराशाजनक आणि दु:खद असल्याचं म्हटलं आहे. त्यावेळी रोहित शर्माने सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्यावर मोठं वक्तव्य केलंय.


काय म्हणाला Rohit Sharma ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यकुमारने मर्यादित षटकांमध्ये चांगली कामगिरी केलीये आणि मी अनेकदा सांगितलंय की ज्यांच्याकडे क्षमता आहे त्यांना संधी दिली जाईल, असं रोहित म्हणाला. श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाबद्दल आम्हाला माहिती नाही. श्रेयस अय्यरची जागा रिक्त राहिल्यास आम्ही सूर्यालाच मैदानात उतरवू, असंही रोहित (Rohit Sharma on Suryakumar Yadav) म्हणाला आहे.


कॅप्टन रोहितची Suryakumar Yadav ला वॉर्निंग ?


सूर्यकुमारला वनडेतही चांगली कामगिरी करावी लागणार आहे. क्षमता असलेल्या खेळाडूंना पुरेशी संधी दिली जात नाही असं कधीही वाटू नयं, असं मी आधीच म्हटलंय, असं रोहित म्हणाला. रोहितच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. रोहितने थेट सूर्यकुमारला वॉर्निंग तर दिली नाही ना? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.



पुढे बोलत असताना, शेवटच्या 2 सामन्यांमध्ये सूर्या लवकर बाद झाला पण आरामात राहण्यासाठी त्याला सलग 7-8 किंवा 10 सामने द्यावे लागतील. संघ व्यवस्थापनाचे काम खेळाडूंना संधी देणे आहे, असंही रोहित म्हणाला. 


आणखी वाचा - India vs Australia: टीम इंडियाला लागलं 'सूर्या'ग्रहण; टी-ट्वेंटीचा शेर वनडेत फेल!


दरम्यान, सलग दोन सामन्यात सूर्या गोल्डन डक (Golden Duck) झाला आहे. त्यामुळे टी-ट्वेंटीचा शेर वनडेत फेल झाल्याचं पहायला मिळतंय. मागील सामन्यात देखील सूर्यकुमार स्टार्कचा सामना करताना बाद झाला होता. त्यामुळे आता आगामी सामन्यात सूर्यकुमारला चांगली कामगिरी करून दाखवावी लागणार आहे.