Ind vs Eng : भारत आणि इंग्लंडमध्ये (INSvsEng T-20 World Cup 2022) होणाऱ्या सामन्याची क्रिकेटप्रेमी मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या सामन्यामध्ये विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव यांच्यावर सर्वांच्या नजरा लागून आहेत. या दोन खेळाडूंमुळे भारतीय संघ सेमीफायनलमध्ये जागा पक्की करू शकला आहे. गुरूवारी होणाऱ्या सामन्याआधी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. मात्र भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने मोठं वक्तव्य केलं आहे. (Captain Rohit Sharma will be a game changer in the match against England Marathi Sport News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडविरूद्धच्या मॅचमध्ये विराट कोहली ना सुर्यकुमार यादव हे खेळाडू नाहीतर कर्णधार रोहित शर्मा एक्स फॅक्टर ठरणार असल्याचं मोहम्मद कैफने म्हटलं आहे. रोहितने या स्पर्धेत धावा केल्या नाहीत पण तो एक मोठा सामनावीर खेळाडू आहे. रोहितला इंग्लंडविरूद्ध खेळायला आवडतं त्यामुळे त्याने इंग्लंडविरूद्ध मोठी धावसंख्या केली तर नवल वाटायला नको. ज्यावेळी दबाव असतो त्यावेळी तो मोठी खेळी करतो, असं कैफने म्हटलं आहे.


कर्णधार म्हणून पुढचा सामना रोहित शर्मासाठी खूप मोठा आहे. कारण रोहितचा कर्णधार म्हणून T-20मधील रेकॉर्ड खूप चांगला आहे. मला वाटते की त्याने त्याच्या कर्णधारपदाची चांगली छाप उमटवली आहे, असंही कैफ म्हणाला.  तसं पाहायला गेलं तर रोहित हा मोठा खेळाडू आहे मात्र या स्पर्धेत त्याला छाप उमटवता आली नाही. 


दरम्यान, रोहित शर्माला अजून मोठी खेळी खेळता आलेली नाही. T20 विश्वचषक 2022 मध्ये त्याने 5 सामन्यात 17.80 च्या सरासरीने केवळ 89 धावा केल्या आहेत. रोहित इंग्लंडविरूद्धच्या सामन्यामध्ये कसं प्रदर्शन करतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.