Rohit Sharma, India Split Captaincy: भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या करिअरशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे. (Cricket News in Marathi) याचवर्षी तो एखाद्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करु शकतो, अशी मोठी शक्यता आहे. (Cricket News) टी-20 विश्वचषक 2022 मधील पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Sport News in Marathi


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित सध्या न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेत संघाचे नेतृत्व करत आहे. या सगळ्या दरम्यान रोहित शर्माच्या भविष्याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. यावर्षी तो एखाद्या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करु शकतो. टी-20 विश्वचषक 2022 पासून त्याने भारतासाठी एकही टी-20 सामना खेळलेला नाही. 


रोहित शर्मा 'या' फॉरमॅटमधून निवृत्त होणार !


इन्साइडस्पोर्टच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर एक किंवा दोन फॉरमॅटमधून निवृत्त होऊ शकतो. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इन्साइडस्पोर्टला सांगितले की, 'भावी कर्णधारपदाबद्दल बोलण्याची ही वेळ नाही. रोहित आमचा कर्णधार आहे आणि त्यानंतरच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वचषकानंतर चर्चा होईल. रोहित विश्वचषकानंतर त्याच्या भविष्याबाबत निर्णय घेऊ शकतो. हार्दिक पांड्या याला एकदिवसीय क्रिकेटचे उपकर्णधारपद देण्यात आले असून, तो भविष्यातही तो कर्णधारपद स्वीकारु शकतो.


या खेळाडूंना भविष्यात कर्णधारपद मिळेल


36 वर्षीय रोहित शर्मानंतर  (Rohit Sharma) केएल राहुल कसोटी  (KL Rahul)फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करु शकतो. त्याचवेळी, हार्दिक पांड्या टी-20 आणि वनडेमध्ये संघाचा कर्णधार होण्यासाठी मोठा दावेदार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इन्साइडस्पोर्टला सांगितले की, 'केएल राहुल कसोटीत उपकर्णधार आहे आणि त्यावरुन तो उत्तराधिकाराची योजना समजू शकते. पुजारा आणि ऋषभ दोघेही त्याच ठिकाणी आहेत. त्यामुळे उपकर्णधारपदात पर्यायांची कमतरता नाही. ते पुढे म्हणाले, 'हार्दिक कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करत आहे. तो तरुण आहे. सध्या तरी रोहितनंतर तोच एक चांगला पर्याय आहे. त्यांना पाठिंबा दिला पाहिजे.


T20 विश्वचषकापूर्वी मोठा बदल ?


भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांच्या माहितीनुसार बोर्ड 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या T-20 विश्वचषकासाठी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा संघ तयार करायचा आहे. रोहित, माजी कर्णधार विराट कोहली आणि अनुभवी केएल राहुल यांना श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या T-20 मालिकेसाठी लहान फॉरमॅट संघात समाविष्ट करण्यात आले नाही. आता न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या T-20 मालिकेतही या ज्येष्ठ खेळाडूंना स्थान देण्यात आलेले नाही.