कोलंबो : शार्दूल ठाकूरने गुरुवारी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्याद्वारे पदार्पण केले. भुवनेश्वर कुमारला या वनडेत आराम देण्यात आला होता. त्यामुळे शार्दूलने या सामन्यातून वनडेत पदार्पण केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२५ वर्षीय शार्दूल भारताकडून वनडेत पदार्पण करणारा २१८वा खेळाडू ठरला. महाराष्ट्रात जन्मलेल्या ठाकूरला श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेआधी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी निळी कॅप दिली. 


यावेळी शार्दूलसह संघातील इतर सहकारीही उपस्थित होते. याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केलाय. यात कर्णधार विराट कोहली शार्दूलशी मस्ती करताना दिसतोय. जेव्हा शार्दूल शास्त्रींकडून कॅप घेण्यासाठी जातो तेव्हा पाठीमागून विराट कोहली त्याला लाथ मारतो. याआधी कोहलीने जयंत यादवला अशाच मजामस्तीने हैराण केले होते.