Carlos Alcaraz: 20 वर्षाच्या पोरानं मोडली जोकोविचची `बादशाहत`; दुसऱ्यांदा जिंकला ग्रँड स्लॅम!
Wimbledon`s Men Final: सामन्याच्या सुरवातीला कोर्लोसवर (Carlos Alcaraz) जोकोव्हिच भारी पडत होता. त्यानंतर कार्लोसनही प्रतिकार करत गेममध्ये पुनरागमन केलं आणि सामना 1-6, 7-6 (6), 6-1, 3-6, 6-4 ने जिंकला.
Carlos Alcaraz Win Wimbledon's Men Final: नोव्हाक जोकोविच आणि कार्लोस अल्कराझ यांच्यात विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत अंतिम सामना चुरशीचा झाला. सामना कार्लोस अल्कराझ यानं जिंकला आहे. अव्वल मानांकित कार्लोस अल्कराझ आणि नोव्हाक जोकोव्हिच यांच्यात हा सामना चांगलाच रंगात आला होता. मात्र, कार्लोसने सामना फिरवला आणि जोकोव्हिचची बादशाहत मोडीस काढली. सामन्याच्या सुरवातीला कोर्लोसवर जोकोव्हिच भारी पडत होता. त्यानंतर कार्लोसनही प्रतिकार करत गेममध्ये पुनरागमन केलं आणि सामना 1-6, 7-6 (6), 6-1, 3-6, 6-4 ने जिंकला.
नेमकं काय झालं?
नोव्हाक जोकोव्हिच आणि कार्लोस अल्कराझ रविवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत जेतेपदासाठी आमनेसामने आले होते. या लढतीत बाजी मारून कारकिर्दीतील 24 वं ग्रँड स्लॅम जेतेपद साजरे करण्यासाठी जोकोविच सज्ज होता. मात्र, 20 वर्षाच्या कार्लोस अल्कराझने जोकोव्हिचचा 3-2 ने पराभव केला. अखेरचा सेट 6-4 ने जिंकत जोकोव्हिचचा तब्बल 10 वर्षानंतर पराभव झाला आहे.
जोकोविच नवव्यांदा 'विम्बल्डन'ची आणि 35 व्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम लढत खेळली. 2013 वगळता आतापर्यंत खेळलेली 'विम्बल्डन'ची प्रत्येक अंतिम लढत जोकोविचने जिंकली आहे. 2013 मध्ये अँडी मरेकडून अंतिम फेरीत जोकोविचला हार पत्करावी लागली होती. अल्कराझने गेल्या वर्षी अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे यंदा तो भारी ठरणार का? असा सवाल विचारला जात होता.
पाहा Video
जोकोविचने मोडली रॅकेट
विम्बल्डन सामन्यादरम्यान चित्रविचित्र हावभाव करण्यासाठी नोव्हाक जोकोविच जगभर ओळखला जातो. मात्र, आजच्या सामन्यात त्याचा राग पहायला मिळाला. त्याने सामन्यादरम्यान रॅकेट मोडली. उपांत्य फेरीचा सामना सुरू असताना काही प्रेक्षक जोकोविचची हुर्यो उडवत होते. पण या सगळ्याचा परिणाम त्याने आपल्या खेळावर होऊ दिला नाही. दुसरा सेट जिंकताच जोकोविचने रडण्याचा अभिनय करत प्रेक्षकांना चिडविलं. सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला, 'सामन्यादरम्यान जेवढी माझी टर उडविली जाते, तेवढाच मी अजून खंबीर होतो.' यामुळे जोकोविचची ही रिॲक्शन सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये होती.