मुंबई : आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक संपली आहे. बीसीसीआयच्या माहितीनुसार भारत सरकारने आयपीएलसाठी परवानगी दिली आहे. आयपीएलचे अंतिम वेळापत्रक ठरले आहे. आता ही स्पर्धा युएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान खेळली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय महिलांचा आयपीएलही खेळला जाईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. आयपीएलचे सर्व प्रायोजक अबाधित आहेत, याचा अर्थ असा की चीनी प्रायोजक विव्हो आयपीएलचे मुख्य प्रायोजक म्हणून कायम राहतील.


10 नोव्हेंबरला आयपीएल फायनल


ही स्पर्धा 19 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 53 दिवस चालेल. आयपीएलची फायनल 10 नोव्हेंबर रोजी होईल, ज्यामुळे प्रसारकांना दिवाळीच्या आठवड्याचा फायदा देईल. आयपीएलचे एका दिवसात दोन सामने असे 10 दिवस खेळविण्यात येणार असल्याचे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.


आयपीएलची तारीख निश्चित होताच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याने इंस्टाग्रामवर स्वत: चा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो सेलिब्रेट करताना दिसत आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे - दुबईला जाण्यासाठी विमान पकडण्यासाठी मी विमानतळाच्या दिशेने धावतो आहे. #IPL2020