Champions Trophy 2025 : 19  फेब्रुवारी पासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) ला सुरुवात होणार आहे. जवळपास 8 वर्षांनी आयसीसीने (ICC) यंदा पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले. परंतु यापूर्वी इंटरनेशनल क्रिकेट काउंसिलमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ज्योफ एलार्डिस यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं असून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानातील तयारीचे स्पष्ट चित्र सादर करण्यात अपयश येणे हे त्यांच्या राजीनाम्या मागील एक कारण असू शकते असं बोर्डातील एका सदस्याने सांगितले.  


2012 मध्ये मिळाली होती मोठी जबाबदारी : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

57 वर्षीय ज्योफ एलार्डिस हे ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये संचालकी प्रबंधक म्हणून काम केल्यावर 2012 मध्ये आयसीसीमध्ये महाप्रबंधक म्हणून सामील झाले होते. नोव्हेंबर 2021 मध्ये आठ महिने कार्यवाहक सीईओ म्हणून काम केल्यावर त्यांची आयसीसीच्या सीईओ पदावर नियुक्ती झाली. 


एलार्डिसने का दिला राजीनामा? 


आयसीसीच्या अधिकृत निवेदनात माजी सीईओ ज्योफ एलार्डिस यांनी आपल्या पदाचा राजीनामा का दिला याबाबत कारणांचा उल्लेख केलेला नाही. परंतु आयसीसीतील एका सूत्राने पीटीआयला नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, अमेरिकेत आयसीसी टी 20 वर्ल्ड कप खेळण्याची स्थिती आणि बेजेट अधिक असल्याने मोठे अपयश आले. यासंबंधित ऑडिटिंग अजूनही केले जात आहे. तसेच ज्या मुद्द्यावर राजीनामा दिला गेला त्यातील कळीचा मुद्दा हा चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी हा सुद्धा होता. आयसीसीचे सीईओ म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफी सारख्या महत्त्वाच्या स्पर्धेचे आयोजन करण्याच्या पाकिस्तानच्या तत्परतेबद्दल त्यांनी चित्र स्पष्ट करणे महत्वाचे होते, परंतु तसे अद्याप झाले नाही. 


हेही वाचा : 13 वर्षांनी विराट कोहली खेळणार रणजी ट्रॉफी मॅच, फ्री मध्ये कुठे पाहू शकता Live?


पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीवर अनेक प्रश्न : 


चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहेत. सुरक्षेच्या कारणामुळे टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार नाही, त्यांचे सामने दुबईत खेळवले जातील. आयसीसीसाठी आता मोठं टेन्शन हे आहे की रावळपिंडी आणि कराची येथील ज्या स्टेडियमवर चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळवले जाणार आहेत ती ठिकाण अद्यापही निर्माणाधीन असून तेथे अजूनही काम सुरु आहे. तेथील कामांचे समोर येणारे व्हिडीओ आणि फोटो सकारात्मक नाहीत.