मुंबई : रंगतदार लढतीत भारतीय संघाला पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता कोहलीचा संघ टी-२० मालिकेत बरोबरी साधण्याच्या उद्देशानचं मैदानात उतरेल. मेलबर्नमध्ये भारतीय आणि ऑस्ट्रेलियामध्य़े दुसरा टी-२० सामना रंगणार आहे. या सामन्यावरही पावसाचं सावट आहे. या सामन्यात भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या संघात बदल होण्याची शक्यताही कमी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी यजुवेंद्र चाहलला खलिल अहमदऐवजी संघात स्थान देण्यात येऊ शकतं. आता भारतीय संघ मालिकेत कमबॅक करणार का याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा ४ रननी निसटता पराभव झाला होता. विजयासाठी १७४ रनची आवश्यकता असताना भारताला १६९/७ एवढाच स्कोअर करता आला. पाऊस पडल्यामुळे ही मॅच १७ ओव्हरची करण्यात आली होती. १७४ रनचा पाठलाग करताना भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ओपनर रोहित शर्मा ७ रनवर आऊट झाला. पण शिखर धवननं ४२ बॉलमध्ये ७६ रनची खेळी केली. यामध्ये १० फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. पण लोकेश राहुल, विराट कोहली आणि शिखर धवनच्या रुपात भारताला लागोपाठ ३ झटके लागले.