Chamika Karunaratne Viral Video : क्रिकेटविश्वात खेळाडूंच्या मागे दुखापतींचं ग्रहण लागल्याचं दिसत आहे. कारण गेल्या 24 तासांमध्ये एक दोन नाहीतर तब्बल 11 खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झाल्याचं समोर आलं आहे. भारत आणि बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचे तीन खेळाडू दुखापती झाले आहेत. दुसरीकडे लंका प्रीमिअर लीगमध्ये एका खेळाडूचे दात पडले आहेत. (chamika karunaratne lost 3 4 teeth taking catch lanka premier league galle gladiators vs kandy falcons latest marathi sport news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की काय झालं? 
लंका प्रीमियर लीग (LPL) मध्ये गॅले ग्लॅडिएटर्स आणि कॅंडी फाल्कन्स यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये ही घटना घडली. या सामन्यादरम्यान, चमिका करुणारत्नेने नुवानिंदू फर्नांडोचा अप्रतिम झेल घेतला. मात्र हा झेल घेताना त्याच्यासोबत मोठा अपघात झाला. कॅच झेलताना चमिकाला अंदाज न आल्याने चेंडू चमिकाच्या गुणरत्नेच्या तोंडावर बसला. 


चमिकाला चेंडू इतका झोरात लागला की त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागलं. इतकंच नाहीतर त्याचे तीन-चार दातही पडले. ब्रेथवेटच्या पहिल्याच चेंडूवर ही दुखापत झाली. मोठी दुखापत होऊनही त्याने चेंडू मात्र सोडला नाही. चमिकाला थेट रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 



दरम्यान, गॅले ग्लॅडिएटर्सने 20 षटकांत 8 बाद 121 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना आणि कॅंडी फाल्कन्स संघाने 15 ओव्हर्समध्येच 5 विकेट्सच्या मोबदल्यात 123 धावा करत हे लक्ष्य पूर्ण केलं.