चॅम्पियन्स ट्रॉफी : रोहित, अजिंक्यच्या बॅटमध्ये चिप?
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये यावर्षी क्रिकेट चाहत्यांना नवे तंत्रज्ञान पाहायला मिळणार आहे. यावेळी फलंदाजांच्या बॅटमध्ये चिपचा वापर करण्यात आलाय.
लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये यावर्षी क्रिकेट चाहत्यांना नवे तंत्रज्ञान पाहायला मिळणार आहे. यावेळी फलंदाजांच्या बॅटमध्ये चिपचा वापर करण्यात आलाय.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय क्रिकेट संघातील दोन स्टार खेळाडूंच्या बॅटमध्ये ही चिप बसवण्यात येणार आहे. यात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्या नावाचा समावेश आहे.
४जूनच्या सामन्यात या चिपचा वापर केला जाण्याची सूत्रांची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रत्येक संघातील तीन खेळाडूंच्या बॅटमध्ये या चिपचा वापर केला जाणार आहे.
उद्यापासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच इंग्लंडमध्ये सुरुवात होतेय. भारताचा पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होतोय.