लंडन : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये विराट कोहलीची जीभ खूप व्हायरल होत आहे. आज बर्मिंघममध्ये भारत बांगलादेश सामना रंगतो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात बांगलादेश मजबूत स्थितीत असताना ३६ षटकात केदार जाधवने बांगलादेशला पाचवा झटका दिला.


दुसऱ्या चेंडूवर बांगलादेशचा माजी कर्णधार आणि विद्यमान विकेटकीपर फलंदाज मुशफिकर रहीम याला पॅव्हेलियमध्ये पाठवले. 


रहीम पुढे जाऊन चौकार लगावण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याने सरळ चेंडू विराटच्या झोळीत टाकला. त्यानंतर विराटने खूप लांब अशी जीभ बाहेर काढली. जसे तो रहीमला चिडवत होता. 


 



 


रहिम आऊट होईपर्यंत बांगलादेशचा स्कोअर १७९ होता. रहिम याने ८५ चेंडूत चार चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या.