रोहित शर्मा -शिखर धवन जबरदस्त जोडी, बनवला हा विक्रम
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप बीच्या भारत आणि श्रीलंका सामन्यात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी आपल्या नावावर एक आगळा वेगळा रेकॉर्ड केला आहे.
लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप बीच्या भारत आणि श्रीलंका सामन्यात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी आपल्या नावावर एक आगळा वेगळा रेकॉर्ड केला आहे.
रोहित आणि शिखरने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये १०० पेक्षा अधिक धावांची भागिदारी करण्याचा एक आगळावेगळा विक्रम केला आहे. या दोघांनी १०० धावांची भागिदारी चौथ्यांदा केली आहे त्यामुळे या लिस्टमध्ये दोघे शिखरावर आहेत.
या सामन्यात रोहित आणि शिखर यांनी १९.२ चेंडूत १०० धावांची भागिदारी केली. रोहित ५९ चेंडूत चार चौके आणि एक षटकारसह ५२ आणि धवनने ५८ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ४२ धावा करत शतकीत भागिदारी केली.
यापूर्वी वेस्ट इंडिजच्या गेल-चंद्रपॉल आणि हर्षल गिब्ज आणि ग्रॅम स्मिथ यांच्या जोडींच्या नावावर प्रत्येकी २-२ शतकांची भागीदारी आहे.