चॅम्पियन्स ट्रॉफी : तब्बल १९ वर्षांनंतर भारत बांग्लादेश आमने-सामने
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या सेमीफायनलमध्ये आज भारताचा मुकाबला बांग्लादेशविरुद्ध आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांग्लादेशानं ११ मॅच खेळल्या असल्या तर गेल्या १९ वर्षांत पहिल्यांदाच या दोन टीम्स आमने-सामने उभ्या ठाकल्यात.
बर्मिंघम, इंग्लंड : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या सेमीफायनलमध्ये आज भारताचा मुकाबला बांग्लादेशविरुद्ध आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांग्लादेशानं ११ मॅच खेळल्या असल्या तर गेल्या १९ वर्षांत पहिल्यांदाच या दोन टीम्स आमने-सामने उभ्या ठाकल्यात.
तसं पाहिलं तर, भारत आणि बांग्लादेश दरम्यान आत्तापर्यंत एकूण ३२ वनडे मॅच खेळल्या गेल्यात. ज्यामध्ये भारतानं २६ आणि बांग्लादेशनं ५ मॅच जिंकल्यात तर एक मॅच ड्रॉ झाली.
आयसीसी टूर्नामेंटमध्ये मात्र या दोन्ही टीम्सदरम्यान आत्तापर्यंत सहा मॅच खेळल्या गेल्यात. यापैंकी पाच भारतानं जिंकल्यात तर एका मॅचमध्ये बांग्लादेशला यश मिळालं.