2024 चं IPL कोण जिंकणार? ChatGPT ने घेतलं `या` संघाचे नाव; तुम्हाला हे उत्तर पटतंय का?
IPL 2024 : उद्यापासून आयपीएलचा 17 वा हंगामा सुरु होणार आहे. आयपीएलचा पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगणार आहे. मात्र यापूर्वीच आयपीएलचा कोणता संघ जिंकू शकता याबाबत भविष्यवाणी करण्यात आली.
IPL 2024 Latest News in Marathi : आयपीए 2024 मधील 17 वा हंगामातील पहिला सामना उद्या म्हणजेच 22 मार्चला चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगणार आहे. हा सामना शुक्रवारी चेन्नईतील के एमए चिदंबरम स्टेडियम धोनी विरुद्ध कोहली यांच्यात असणार आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामात एकूण दहा संघ असणार आहेत. यामध्ये यात दिल्ली, कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, कोलकाता नाइट राइडर्स, पंजाब किंग्स आणि सनराइजर्स हैदराबादचा समावेश असणार आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वीच आयपीएलसंदर्भात भविष्यवाणी करण्यात येत आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म (AI) असलेल्या ChatGPT कडून आयपीएल विजेतासंदर्भात भविष्यवाणी करण्यात आली. यावर IPL 2024 च्या विजेत्याबद्दल विचारले असता, इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर पिछाडीवर असेल. असं मत त्यांनी मांडल आहे. तसेय या स्पर्धेत सर्वात यशस्वी संघ हा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज पुन्हा एकाद जिंकण्यासाठी आघाडीवर असेल. कोणता संघ विजेता असेल, यावर ChatGPT ने उत्तर दिले की, एकूण खेळाडू आणि संघ यांची कामगिरी पाहिल्यावर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स सर्वोत्तन संघ ठरेल. या दोन्ही संघाचे फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात सातत्या आहे. यामुळे दोन्ही संघ प्रबळ दावेदर म्हणून समोर आले आहे. मात्र आयपीएलमध्ये कोणताही संघ दमदार कामगिरीच्या जोरावर विजयी होऊ शकतो, असं मत ChatGPT ने मांडल आहे.
तसेच सीएसकेजवळ महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात अनुभवी खेळाडू आहेत. त्यांची टीम संतुलित असून या संघात मोइन अली , रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूरसारखे खेळाडू आहेत. यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही पातळीवर हा संघ चांगला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली हा संघ चांगला तयार झाला आहे.
दरम्यान आयपीए 2024 मधील 17 वा हंगामातील पहिला सामना उद्या म्हणजेच 22 मार्चला चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगणार आहे. हा सामना शुक्रवारी चेन्नईतील के एमए चिदंबरम स्टेडियम धोनी विरुद्ध कोहली यांच्यात असणार आहे. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांचे चाहते या सामन्यासाठी उत्सुक आहेत. आयपीएलचा पहिलाच सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.