KKR vs RCB: नक्की टॉस कोण जिंकलं? रेफरीच्या निर्णयामुळे संतापला Nitish Rana!
सामना सुरु होण्यापूर्वी मैदानावर एक गडबड झालेली दिसून आली. सामना सुरु होण्यापूर्वी टॉसच्या वेळी ही गडबड झाली. यामुळे कोलकाता नाईड रायडर्सचा कर्णधार नितीश राणा (Nitish Rana) चांगलाच संतापला होता. याचा व्हिडीओ मात्र आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
KKR vs RCB: आयपीएलमध्ये आज 9 वा सामना खेळवला जातोय. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (Royal Challengers Bangalore) यांच्यामध्ये हा सामना खेळवला जातोय. बऱ्याच वर्षांनी ईडन गार्डन्सच्या मैदानावर आयपीएलचा (IPL 2023) सामना खेळवला जातोय. दरम्यान सामना सुरु होण्यापूर्वी मैदानावर एक गडबड झालेली दिसून आली. सामना सुरु होण्यापूर्वी टॉसच्या वेळी ही गडबड झाली. यामुळे कोलकाता नाईड रायडर्सचा कर्णधार नितीश राणा (Nitish Rana) चांगलाच संतापला होता. याचा व्हिडीओ मात्र आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
टॉसच्या कॉलवरून झालं कन्फ्यूजन
झालं असं की, टॉससाठी दोन्ही टीमचे कर्णधार मैदानावर आले होते. त्यावेळी टॉससाठी नितिश राणाने नाणं उडवलं. यावेळी रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसने टॉस जिंकला. मात्र रेफरीने फाफचा कॉल ऐकला नाही आणि रेफरी नितिशने म्हणजेच कोलकाताने टॉस जिंकला असं सांगितलं.
नितिश राणा संतापला
अशात फाफ ड्यु प्लेसिस मध्ये पडला आणि मी हेड कॉल दिला होता, असं सांगितलं. दरम्यान हा झालेला गोंधळ कोलकाता कर्णधार नितिश राणाला मात्र अजिबात आवडला नाही. त्याच्या चेहऱ्यावरून नाराजी स्पष्टपणे दिसून येत होती. दरम्यान फाफ ड्यू प्लेसिसने टॉस जिंकून प्रथ गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
दोन्ही टीम्सची प्लेइंग-XI
कोलकाता नाईट राइडर्स: मनदीप सिंह, रहमानुल्लाह गुरबाज़, वेंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, टिम साउदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू: फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मायकल ब्रेसवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), डेविड विली, हर्षल पटेल, आकाश दीप, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज