IPL 2019: धोनीच्या चुकीमुळे चेन्नईनी मॅच गमावली?
धोनीने नवदीप सैनीच्या १९ व्या ओव्हरमध्ये १ रन घेण्यास तब्बल ३ वेळा नकार दिला.
बंगळुरु : बंगळुरुविरुद्धच्या रोमांचक मॅचमध्ये चेन्नईचा फक्त १ रनने पराभव झाला. धोनीने संघर्ष करत चेन्नईला जिंकवण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले, पण यामध्ये त्याला यश आलं नाही. पण चेन्नईच्या विजयाच्या आड धोनीच तर आला नाही ना? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
बंगळुरुने चेन्नईला विजयासाठी १६१ रनचे आव्हान दिले होते. याचा पाठलाग करताना चेन्नईला फक्त १६० रनच करता आल्या. धोनीने विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करुन देखील पराभवाला सामोरे जावे लागले. धोनीने ४८ बॉलमध्ये बॉलमध्ये नाबाद ८४ रन काढल्या. धोनीने अखेरपर्यंत मैदानात उपस्थित होता तरी देखील चेन्नईला जिंकता आले नाही.
नक्की कुठे चूकला धोनी?
मॅचची १९ वी ओव्हर नवदीप सैनी टाकणार होता. चेन्नईला विजयासाठी २ ओव्हरमध्ये ३६ रनची गरज होती. धोनी नाबाद ५१ रनवर मैदानात होता. तर त्यासोबत ड्वेन ब्राव्हो होता. धोनीने नवदीप सैनीच्या या ओव्हरमध्ये एक रन घेण्यास तब्बल ३ वेळा नकार दिला. त्यामुळेच की काय चेन्नईचा शेवटच्या बॉलवर पराभव झाल्याची चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये सुरु आहे.
धोनीने नवदीप सैनीच्या पहिल्या बॉलवर स्वीपर शॉट कवरच्या दिशेने लगावला. त्यावेळेस १ रन घेण्याची संधी होती. परंतु धोनीने एकेरी रन घेतली नाही. याच प्रकारे धोनीने पुढचाच बॉल लॉन्ग-ऑनच्या दिशेने मारला होता. या बॉलवर सुद्धा १ रन घेण्याची संधी होती. धोनीने इथे पण रन घेण्यास नकार दिला. नेगीने तिसरा बॉल नो बॉल टाकला. यावर धोनीने सिक्सर लगावला. पुढील बॉलवर धोनीने २ रन काढल्या. धोनीने चौथ्या बॉलवर लॉन्ग-ऑफला बॉल मारला. इथे देखील १ रन घेण्याची संधी होती. पण धोनीने इथे देखील ब्राव्होला रन घेण्यास नाकारले. धोनीने केलेल्या या सर्व प्रकारावरून धोनीला बहुतेक ड्वेन ब्राव्होच्या क्षमतेवर विश्वास नसावा. धोनीने ओव्हरच्या पाचव्या बॉलवर १ रन घेतली. पण धोनीने याआधी ३ एकेरी रन घेण्यास नकार दिला.
पवन नेगीने १९ व्या ओव्हरमध्ये केवळ १० रन दिले. त्यामुळे चेन्नईला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी २६ रनची गरज होती. चेन्नईला विजयासाठी आवश्यक असलेल्या २६ रन करण्यास अपयश आले. मैदानात असलेल्या धोनीने पहिल्या पाच बॉलमध्ये २४ रन ठोकल्या. धोनीच्या फटकेबाजीमुळे चेन्नईला मॅच जिंकण्यासाठी २ रनची गरज होती. परंतु त्या २ रन करण्यास अपयश आले. त्यामुळे धोनीने न घेतलेल्या ३ एकेरी रन घेतल्या असत्या तर चित्र काही वेगळेच असते.