CSK vs MI : चेपॉकच्या मैदानावर चेन्नईच बॉस; मुंबईचा 6 विकेट्सने पराभव
CSK vs MI : आयपीएलमधील एल क्लासिकोमध्ये आज अखेर चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारलीये. चेन्नईने मुंबईचा 7 विकेट्सने पराभव केला आहे.
CSK vs MI : चेपॉक स्टेडियमवर ( M.A. Chidambaram Stadium ) मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) यांच्यात आयपीएलमधील ( IPL 2023 ) एल क्लासिको रंगली होती. या सामन्यात पुन्हा एकदा चेन्नईने मुंबई इंडियन्सवर ( Mumbai Indians ) विजय मिळवला आहे. चेन्नईने 7 विकेट्सने मुंबईवर विजय मिळवलाय. या विजयासह चेन्नईची टीम पॉईंट्स ( IPL Points Table ) टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. चेन्नईचा यंदाच्या सिझनमधील हा सहावा विजय होता.
मुंबईच्या फलंदाजांची खराब कामगिरी
आजच्या या एल क्लासिकोमध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय टीमसाठी खूप फायदेशीर ठरला. तर मुंबई इंडियन्सनचे प्रमुख फलंदाज अक्षरशः पत्त्यांप्रमाणे ढेपाळले. 20 ओव्हरमध्येम मुंबईच्या टीमने 8 विकेट्स गमावून 139 रन्स केले. यावेळी मुंबईने चेन्नईच्या टीमला 140 रन्सचं सहज आव्हान दिलं.
मुंबईने बदलला फलंदाजी क्रम
आजच्या सामन्यात मुंबईच्या टीमने त्यांच्या फलंदाजी क्रमामध्ये बदल केला होता. रोहित शर्माच्या जागी कॅमरून ग्रीन फलंदाजीला उतरला, मात्र तो अवघे 6 रन्स करून माघारी गेला. कर्णधार रोहित देखील शून्यावर माघारी परतला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेरा यांनी चांगली पार्टनरशिप केली. मात्र सूर्या 26 रन्सवर बोल्ड झाला. या सामन्यात नेहल वढेराने 51 बॉल्समध्ये 64 रन्सची खेळी केली.
चेन्नईचा 6 विकेट्ने विजय
140 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना चेन्नईच्या टीमची सुरुवात चांगली झाली. डेवोन कॉन्वे आणि ऋतुराज गायकवाड यांच्यामध्ये 46 रन्सची पार्टनरशिप झाली. गायकवाड बाद झाल्यानंतर मराठमोळा अजिंक्य रहाणे क्रिजवर आला आणि त्यानेही मोठे शॉट मारले. मात्र 21 रन्सवरून अजिंक्यला पव्हेलियनचा रस्ता धरावा लागला. अखेरीस कॉन्वे आणि धोनीने मिळून सीएसकेला विजय मिळवून दिला.