चेन्नई : कावेरी नदीचा पाणी प्रश्न पेटल्यामुळे चेन्नईत होणाऱ्या आयपीएलच्या मॅच पुण्यामध्ये हलवण्यात आल्या. २ वर्षानंतर चेन्नईच्या टीमनं आयपीएलमध्ये कमबॅक केलं होतं. यावर्षी चेन्नईच्या टीमची घरच्या मैदानात एक मॅचही झाली. पण प्रेक्षकांमधून फॅप डुप्लेसिस आणि रवींद्र जडेजावर आंदोलकांनी बूट फेकून मारला. यानंतर चेन्नईच्या मॅच पुण्यामध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे चेन्नईच्या चाहत्यांची घोर निराशा झाली. पण तरीही चेन्नईच्या फॅन्सचं त्यांच्या टीमवरचं प्रेम जराही कमी झालेलं नाही.


चाहत्यांनी बूक केली संपूर्ण ट्रेन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीमला सपोर्ट करण्यासाठी फॅन्सनी चेन्नईहून पुण्यासाठी संपूर्ण ट्रेनच बूक केली आहे. याचा व्हिडिओ चेन्नईच्या टीमनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शुक्रवारी चेन्नई आणि राजस्थानमध्ये पुण्यात ही मॅच खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही टीम त्यांच्या आधीच्या मॅच हरल्या आहेत. त्यामुळे विजयी मार्गावर येण्यासाठी या टीम मैदानात उतरतील. पण पुण्याच्या मैदानातले प्रेक्षक मात्र चेन्नईला पाठिंबा देतील.