मुंबई : कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा भारतावर सध्या वाईट परिणाम झाला आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच क्रीडा जगताला देखील सध्या कोरोना संकटाने ग्रासले आहे. दरम्यान, क्रिकेट जगतातून एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स कडून खेळणारा वेगवान गोलंदाज चेतन सकरिया (Chetan Sakariya) याच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. सकरियाने नुकतीच त्याच्या वडिलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. सकारिया म्हणाला होता की, 'मी भाग्यवान आहे कारण काही दिवसांपूर्वी मला राजस्थान रॉयल्सने माझ्या वाट्याचे पैसे मला दिला होता. मी ताबडतोब घरी पैसे पाठविले आणि यामुळे माझ्या वडिलांना मोठी मदत झाली.'


वास्तविक, आयपीएल 2021 दरम्यान चेतन साकारिया बद्दल माहिती मिळाली की, वडिलांनी ऑटो रिक्षा चालवून मुलाला क्रिकेटर बनविले आहे. सकरियाच्या घराची अवस्था फारशी चांगली नव्हती. इतकेच नव्हे तर चेतनच्या मोठ्या भावानेही आयपीएलच्या लिलावापूर्वी आत्महत्या केली. अशा परिस्थितीत चेतनवर दु:खाचा डोंगर फुटला आहे.'


कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेमुळे भारताला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे आणि गेल्या काही दिवसांपासून दररोज संसर्गाच्या चार लाखाहून अधिक नवीन घटना समोर येत आहेत. महत्वाची औषधे आणि ऑक्सिजन नसल्यामुळे हे संकट अधिकच वाढले आहे. यामुळे दररोज हजारो लोक आपला जीव गमावत आहेत.