सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्ट सामन्यात चेतेश्वर पुजाराने आणखी एक जबरदस्त शतक ठोकलं आहे. भारतीय टीमने ४ विकेट गमवत २६० रन पूर्ण केले आहेत. चेतेश्वर पुजाराने पुन्हा एकदा शानदार शतक ठोकत भारताला चांगल्या स्थितीत नेऊन ठेवलं आहे. चेतेश्वर पुजाराचं या सिरीजमधलं हे तिसरं शतक आहे. चेतेश्वर पुजाराने पुन्हा एकदा आपण द वॉल असल्याचं सिद्ध केलं आहे. चेतेश्वर पुजाराच्या टेस्टमधल्या या शानदार खेळीबद्दल राहुल द्रविड प्रमाणेच तो भारतीय टेस्ट क्रिकेटची द वॉल असल्याचं चाहत्यांकडून बोललं जातं. आजच्या सामन्यात शतक ठोकत त्याने हे सिद्ध केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या मैदानात त्याच्या सोबत हनुमा बिहारी १३ रनवर बॅटींग करत आहे. या सामन्यात आपल्या करिअरचा दुसरा टेस्ट सामना खेळणाऱ्या मयंक अग्रवालने ७७ रन केले आहेत. केएल राहुलने पुन्हा एकदा नाराज केलं. तो फक्त ९ रनवर आऊट झाला. विराट कोहली २३ रनवर आऊट झाला. अजिंक्य रहाणे देखील १८ रनवर आऊट झाला.


कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकत आधी बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा या सामन्यात खेळत नाही आहे. त्याच्या जागी के एल राहुलला संधी देण्यात आली होती. उमेश यादवच्या जागी कुलदीप यादवला संघात स्थान मिळालं आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने देखील संघात २ बदल केले आहेत. एरोन फिंच आणि मिशेल मार्शच्या जागी पीटर हँड्सकोम्ब आणि मार्नस लाबुचागनेला टीममध्ये घेतलं आहे. 


टीम इंडिया :


केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.


ऑस्ट्रेलिया टीम :


उस्मान ख्वाजा, मार्कस हॅरिस, मार्नस लाबुचागने, शॉन मार्श, पीटर हैंड्सकॉम्ब, ट्रॅविस हेड, टीम पेन (कर्णधार), पॅट कमिंस, मिशेल स्टार्क, नाथन लियोन, जोश हेजलवुड.