मोटेरा : टेस्ट टीममधील रस्ते जवळपास बंद झाल्याचं लक्षात आल्यावर रणजी ट्रॉफीमध्ये मराठमोठ्या अजिंक्य रहाणेने चमकदार कामगिरी करत मुंबईकडून शतक ठोकलं. यानंतर सौराष्ट्रकडून खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराकडे अनेकांचं लक्ष होतं. मात्र एकंही रन न करता पुजारा माघारी परतला आहे. सध्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई विरूद्ध सौराष्ट्र असा सामना सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्याच्या सुरुवातीच्याच दिवशी मुंबईकडून अजिंक्य रहाणेने शतक झळकावत त्याचा दबदबा दाखवून दिला. टेस्ट टीममध्ये स्वतःला दाखवून देण्यासाठी पुजाराकडे ही एक चांगली संधी होती. मात्र 0 रन्सवर आऊट होत पुजारा या संधीचं सोनं करू शकलेला नाही.


अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्या फॉर्मवर गेल्या काही दिवसांपासून टीका होत होती. इंडियन टेस्ट टीममध्ये दोघंही मोठी खेळी खेळण्यात अपयशी होताना दिसले. अशाच परिस्थितीत टीम मॅनेजमेंट श्रीलंका दौऱ्यावर युवा खेळाडूंना पाठवण्याच्या विचारात आहे.


अजिंक्यने रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना सौराष्ट्र विरुद्ध मोटेरामधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या ए ग्राऊंडमध्ये हे खणखणीत शतक लगावलं होतं. अजिंक्यने 14 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 211 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. मात्र दुसरीकडे सौराष्ट्रकडून चौथ्या नंबरवर खेळण्यास उतरलेला चेतेश्वर पुजारा आज अवघ्या शून्यवर आऊट झाला.