मुंबई: न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात अजिंक्य रहाणे कर्णधार आहे. या सामन्यामध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोघांची कामगिरी म्हणावी तेवढी चांगली राहिली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुजारा आणि रहाणे या दोघांच्या करियरसाठी ही धोक्याची घंटा आहे. ऑस्ट्रेलिया दौरा आणि इंग्लंड सीरिज या दोन्हीमध्ये अजिंक्य रहाणे, पुजारा दोघांची कामगिरी चांगली राहिली नाही. आता न्यूझीलंड विरुद्ध कसोटी सामन्यात संधी देण्यात आली. त्यावेळीही दोघांची कामगिरी चांगली राहिली नाही. 


पहिल्या डावात अजिंक्य रहाणे 63 बॉलमध्ये 35 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 6 चौकार ठोकले. तर पुजाराने 88 बॉलवर केवळ 26 धावा केल्या आहेत. दुसऱ्या डावात रहाणेने 15 बॉलमध्ये 4 धावा केल्या. पुजाराने 33 बॉलमध्ये 22 धावा केल्या आहेत. 


श्रेयस अय्यरने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या सामन्यात आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट फॉरमॅटमध्ये पदार्पण केलं. पहिल्या डावात 171 बॉलमध्ये 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं त्याने 105 धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात 125 बॉलमध्ये 65 धावा केल्या आहेत. 


भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांनी रविवारी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्याबद्दल एक विधान केलं आहे. ते म्हणाले की पुजारा आणि रहाणे लवकरच चांगल्या फॉर्ममध्ये येतील. 


पदार्पणाच्या कसोटीच्या दोन्ही डावात शतक आणि अर्धशतक झळकावणारा श्रेयस अय्यर पुजारा किंवा रहाणेची जागा घेणार का? यावर बोलण्यासाठी विक्रम राठोड यांनी टाळलं. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देणार की नाही? याबाबत काही सांगता येत नाही असंही ते म्हणाले. 


मी समजू शकतो की सध्या दोघंही खराब फॉर्ममध्ये खेळत आहेत. मात्र त्यांनी यापूर्वी ते दोघंही खूप चांगले खेळले आहेत. मला विश्वास आहे की येत्या काळात ते लवकरच पुन्हा एकदा चांगल्या फॉर्ममध्ये खेळताना दिसतील, असा विश्वास विक्रम राठोड यांनी व्यक्त केला. 


आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर अजिंक्य रहाणे किंवा पुजारा ऐवजी अय्यरला संधी देणार का? न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अय्यरला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.