मुंबई : टीम इंडियातून खराब फॉर्ममुळे बाहेर बसण्याची वेळ आली. त्यापाठोपाठ आयपीएलमध्येही संधी मिळेना म्हणून बाहेरच्या देशांमध्ये लीग खेळण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र अडचणी आणि बॅड लक काही कमी होण्याचं नाव घेत नाही. चेतेश्वर पुजाराच्या अडचणी संपता संपेनात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान चेतेश्वर पुजाराला मोठा धक्का बसला आहे. चेतेश्वर पुजारा काउंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्सच्या पहिल्या सामन्यातून डेब्यू करणार होता. मात्र ही संधीही हुकल्याने निराशा आली आहे. पुजाराने इंग्लंडसोबत काउंटी चॅम्पियनशिपसाठी करार केला होता. 


डेब्यू करण्याआधीच पुजाराला मोठा धक्का बसला. ससेक्सच्या पहिल्याच सामन्यातून पुजारा बाहेर झाला. पुजाराला व्हिसा अजून न मिळाल्याने तो वेळेत पोहोचू शकत नाही. त्यामुळे त्याला पहिला सामना खेळता येणार नाही. 


कीथ ग्रीनफील्‍ड यांनी दिलेल्या माहितीनुसार इंग्लंडच्या व्हिसा ऑफिसमध्ये युक्रेनमधील लोकांचं स्थलांतर करण्यासाठी गडबड सुरू आहे. त्यामुळे सध्या तिथे परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आणि व्यस्त अशी आहे. 


पुढच्या आठवड्यात कदाचित पुजारा टीमसोबत जोडला जाईल अशी शक्यता आहे. आधीच पुजारा खराब फॉर्ममुळे टीम इंडियामधून बाहेर बसला आहे. त्यापाठोपाठ आता आयपीएलमध्येही संधी मिळत नाही. आता या लीगमध्येही खेळण्याआधीच पुजाराला अडचणींचा सामना करावा लागत आहे.