टेस्ट क्रिकेटमध्ये पुजाराचा मोठा कारनामा, कोहलीला टाकले मागे
सध्या टीम इंडियाचा बॅट्समन चेतेश्वर पुजारा चांगलाच फॉर्ममध्ये आहे.
नवी दिल्ली : श्रीलंके विरुद्धच्या तिस-या आणि शेवटच्या टेस्टच्या चौथ्या दिवशी पुजाराने एक मोठा कारनामा केलाय. त्याने हा कारनामा करून विराट कोहलीला मागे टाकले आहे.
डीन एल्गरचा तोडला रेकॉर्ड
पुजाराने सात रन्स केल्या केल्या दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गरला मागे टाकत २०१७ मध्ये सर्वात जास्त रन करणा-यांच्या यादीत तो वरच्या क्रमांकावर आहे. एन्गरने २०१७ मध्ये १०९७ रन्स केलेत.
पुजाराने किती केलेत रन्स?
पुजाराने कोटला टेस्टच्या चौथ्या दिवशी श्रीलंके विरूद्ध ४९ रन्सची खेळी केली. यावर्षी त्याच्या नावार ११ टेस्टमध्ये ६७.०५ च्या सरासरीने ११४० रन्स आहेत.
१००० रन्स करणारे चार बॅट्समन
पुजारा यावर्षी १ हजर रन्स पूर्ण करणा-या केवळ ४ बॅट्समनमध्ये सामिल झालाय. यावर्षी त्याच्या आणि एल्गर व्यतिरीक्त श्रीलंकेच्या दिमुथ करूणारत्ने आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांनीही ही कारनामा केलाय.