मुंबई: IPLमध्ये कोरोना घुसल्यामुळे यंदाचा हंगाम अर्ध्यावरच स्थगित करावा लागला आहे. संघातील खेळाडूंचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ लागल्यामुळे IPL स्थगित करावी लागली. कोरोनामुळे असेल किंवा क्रिकेट खेळताना आपल्याकडून उत्तम कामगिरी न झाल्यानं येणारं नैराश्य असेल या दोन्ही गोष्टीवर मात करण्यासाठी कुठेतरी आपलं मन स्थिर आणि शांत होणं गरजेचं असतं. यशस्वी खेळाडू होण्यासाठी सतत नकारात्मक विचारांपासून दूर राहाणं गरजेचं असतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कधीएकेकाळी हाच खेळाडू आपली चांगली कामगिरी होऊ शकत नसल्याच्या दबावातून आईचा पदर धरून रडला होता. आज यशस्वी खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याच्या यशामागचं रहस्य त्याने उलगडलं आहे. 


भारतीय किसोटी क्रिकेटमधील जेष्ठ फलंदाज चेतेश्वर पुजाराने एका मुलाखतीदरम्यान त्याच्या यशामागचं गमक सांगितलं. हे सांगत असताना त्याने त्याच्यावर युवा क्रिकेटमध्ये खेळताना असणारा दबाव आणि आलेल्या समस्या याबाबतही आपला किस्सा चाहते-इतर खेळाडूंसाठी शेअर केला आहे. 


 चेतेश्वर पुजारा म्हणतात की तुमच्या एका नकारात्मक विचारांमुळे पुढच्या सगळ्या गोष्टी नकारात्मकच घडत जातात. योग हा सर्वोत्तम यावर उपाय आहे. प्रार्थना योग याचा आधार सकारात्मक विचारांसाठी होतो. एक वेळ अशी आली होती की मी संघात माझ्यावर असणारा दबावही सहन करू शकत नव्हतो. 


युवा अवस्थेत असताना जेव्हा जेव्हा मी क्रिकेट खेळायचो तेव्हा असणारा दबाव खूप भयंकर होता. हा दबाव कधीकधी सहन व्हायचा नाही. खूपवेळा मी आईसमोर रडायचो आणि म्हणायचो असा दबाव असेल तर मी चांगलं खेळू शकत नाही. 


वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी पुजारा यांनी आपल्या आईला गमवलं. त्यानंतर त्यांनी अधात्मिक गुरूची मदत घेतली. त्यांनी योग, प्रार्थना यातून नकारात्मक विचारांना बाजूला ठेवण्याची मदत घेतली. पुजारा यांना आता कसोटी सामन्यातील उत्तम फलंदाज म्हणून ओळखलं जातं.


चेतेश्वर पुजारा सध्या टेस्ट रँकिंगमध्ये 14 व्या स्थानावर आहेत. त्यांनी IPLमधील शेवटचा सामना 2014मध्ये खेळला होता. त्यावेळी किंग्स इलेव्हन पंजाब संघातून ते खेळले होते. 2010मध्ये त्यांनी कसोटीमधून क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यांच्या कारकीर्दीत 85 सामने खेळून त्यामध्ये 6244 धावा केल्या आहेत. त्यांनी 18 शतक 29 अर्धशतक केले आहेत.