मुंबई : मैदानावर सामन्यादरम्यान असे अनेक किस्से घडतात जे कायमचे लक्षात रहातात. तर कधी-कधी प्रेक्षकांचे अतरंगी कारनामेही सर्वांचं लक्ष वेधून घेतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा किस्सा अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया इथला आहे. गेल्या आठवड्यात San Diego Padres आणि Chicago Cubsदरम्यान, बेसबॉलचा एक सामना खेळवण्यात आला. यावेळी सामना पाहण्यासाठी आलेल्या एका महिलेने पकडलेला कॅच सध्या चर्चेचा विषय बनलाय. व्हिडिओ पाहून प्रत्येक जण हाच विचार करतोय की या महिलने इतक्या वेगात कॅच पकडला कसा असेल?


त्याचं झालं असं की बेसबॉल सामन्यात खेळाडूने टोलावलेला एक चेंडू थेट प्रेक्षक गॅलरीत गेला. याचवेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका महिलेने हा चेंडू झेलला.  पण किस्सा इथेच संपत नाही, तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की या महिलेच्या एका हातात मुल आहे आणि दुसऱ्या हाताने तिने कॅच पकडला. हातातल्या चिमुरड्याला कोणतीही इजा होऊ न देता या महिलेने अगदी चपळाईने कॅच झेलला. कॅच झेलल्यानंतर उपस्थित असलेल्या इतर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून या महिलेचं कौतुक केलं. 


सोशल मीडियात व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. 



सोशय मीडियावर व्हायरल झालेल्या या महिलेचं नाव लेक्सी व्हाईटमोर असं आहे. MLB नावाच्या पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे, आई काहीही करु शकते.