गोल्ड कोस्ट : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारताच्या खात्यात आतापर्यंत दोन सुवर्णपदकांची भर पडलीये. नेमबाजपटूंनी जबरदस्त कामगिरी करताना भारताला पदके मिळवून दिली. १५ वर्षीय अनिस भानवालने २५ मीटर पुरुष रॅपिड फायर पिस्टोल प्रकारात सुवर्णनिशाणा साधला. यासोबतच भारताच्या खात्यात १६ सुवर्णपदके झालीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतक्या कमी वयात अनिशने सुवर्णपदक मिळवत नवा रेकॉर्ड केलाय. तो सगळ्यात तरुण नेमबाजपटू ठरलाय. बॉक्सिंगमध्ये पुरुष ४६-४९ किलो वजनी गटात भारताच्या अमित पंघालाने युगांडाच्या जुमा मिरोला हरवत फायनलमध्ये एंट्री घेतलीये. अमितने फायनलमध्ये एंट्री घेतला भारतासाठी सुवर्ण अथवा रौप्य पदक पक्के केलेय.


टेबल टेनिसमध्ये महिलांच्या डबल प्रकारात भारताची जोडी मोनिका बत्रा आणि मौमा दास यांनी फायनलमध्ये प्रवेश केलाय. या विजयासाह या जोडीने सुवर्ण वा रौप्य पदक पक्के केलेय.


याआधी नेमबाजीत भारताची तेजस्विनी सावंत हिने 457.9 गुण मिळवत सुवर्णपदकावर कब्जा केला होता. तर अंजुमने  455.7 गुणांसह रौप्य पदक मिळवले.