कॉमनवेल्थ मेडलिस्ट भारतीय महिला कुस्तीपटूच्या पतीचा संशयास्पद मृत्यू, वर्षभरापूर्वीच झालं होतं लग्न
कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये मेडल जिंकणाऱ्या भारतीय महिला कुस्तीपटूच्या पतीचा संशयास्पद मृत्यू
Pooja Sihag Husband Death: बर्मिंगहॅम इथं नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारतीय महिला कुस्तीपटू पूजा सिहाग (Pooja Sihag) हिने दमदार कामगिरी करत ब्राँझ मेडल (Bronze Medal) पटकावलं होतं. या यशस्वी कामगिरीला महिना उलटत नाही तोच पूजा सिहाग हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
कुस्तीपटू पूजा सिहाग हिचे पती आनंद सिहाग यांचा मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. आनंद सिहाग हे स्वत:ही कुस्तीपटू होते, राष्ट्रीय स्तरावर त्यांनी चांगली कामगिरी केली होती. आनंद सिहाग यांचे दोन जवळचे मित्र सोनू आणि रवी यांची प्रकृती चिंताजनक असून सोनू आणि रवी हे दोघंही कुस्तीपटू आहेत.
आनंद सिहाग यांचा संशयास्पद मृत्यू
रोहतकमधल्या बोहर गावात पूजा आणि आनंद सिहाग राहतात. शनिवारी संध्याकाळी सात वाजता पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आनंद सिहाग आणि त्याचे दोन मित्र जाट कॉलेजबाहेर एका कारमध्ये काहीतरी पित होते. त्यानंतरच आनंद सिहाग आणि त्यांच्या मित्रांची तब्येत खालावली.
पूजा सिहाग कॉमनवेल्थ मेडलिस्ट
कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये पूजा सिहागने ब्राँझ मेडल पटकावलं होतं. 76 किलो वजनी गटात पूजाने ऑस्ट्रेलियाच्या नाओमी डी ब्रुइनचा (Naomi De Bruin)पराभव केला होता.